अदानी अंबानींच्याही पुढे! संपत्तीत २६१ टक्के वाढ, रोजची कमाई ऐकून बसेल धक्का

अदानी अंबानींच्याही पुढे! संपत्तीत २६१ टक्के वाढ, रोजची कमाई ऐकून बसेल धक्का

संग्रहित छायाचित्र

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे गौमत अदानी (Gautam Adani)  यांनी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना देखील मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षभरात गौतम अदानी आणि कुटुंबियांनी तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अदानी यांच्या संपत्तीत तब्बल २६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ९ टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र गौतम अदानी यांची संपत्ती अंबानी यांच्याहून चारपटीने वाढल्याचे पहायला मिळत आहे. वेल्थ ह्युरेन इंडिया रिच लिस्ट २०२१ ने यासंबंधितील अहवाल प्रकाशित केला आहे.

गौमत अदानी दर दिवसाला १,००२ कोटी रुपयांची कमाई करत आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केला असता त्यांची एकूण संपत्ती ५,०५,९०० कोटींच्या घरात गेली आहे. मागील वर्षी अदानींची एकूण संपत्ती १,४०,२०० कोटी इतकी होती. अदानी यांच्या विक्रमी कामगिरीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बाटलीबंद पाण्याचे उद्योजक असलेले आशियातील श्रीमंत यादीतील चीनचे उद्योजक झोंग शानशान यांना देखील मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर अदानी यांनी आपले नाव कोरले आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्याशी तुलना केली असता गौतम अदानी हे पहिल्यांदा जगातील पहिल्या १० श्रीमंत लोकांच्या यादीत आले आहे. अदानी यांच्यासोबत दुबईतील भाऊ विनोद शांतिलाल यांचा देखील समावेश झाला आहे. मागील वर्षी मुकेश अंबानी यांची दरदिवशी कमाई ही १६९ कोटी होती. यंदा त्यांच्या संपत्तीत ९ टक्क्यांनी वाढ होऊन  ७,१८,००० कोटी संपत्तीची नोंद करण्यात आली आहे. अंबानींच्या तुलनेत अदानींच्या संपत्तीत २६१ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची दरदिवशीची कमाई १,००२ कोटी रुपये आहे आणि एकूण संपत्ती ५,०५,९०० कोटी इतकी झाली आहे.


हेही वाचा – ‘मोदी हेच संपूर्ण जगाचे एकमेव आशास्थान’ ही तर ‘फेक न्यूज’- न्यूयॉर्क टाईम्सचा खुलासा

First Published on: October 1, 2021 9:08 AM
Exit mobile version