माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, घराजवळील सुरक्षेत मोठी वाढ

माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, घराजवळील सुरक्षेत मोठी वाढ

माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कर्णधार कौशल्याची प्रशंसा केली

माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला पु्न्हा धमकी देण्यात आल्यामुळे घराजवळील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गौतमला मेलच्या सहाय्याने धमक्या येत आहेत. आतापर्यंत दोन मेल गौतम गंभीर पाठवण्यात आले होते. परंतु आता त्याच्या अजून एकाही भर झाली असून तिसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. पोलिसांना हा मेल मिळाला असून ते देखील या धमकीची चाचपणी करत आहेत.

गौतम गंभीरला आयसीस काश्मीरकडून तिसऱ्यांदा मेल पाठवण्यात आला आहे. मेलमध्ये दिल्ली पोलिसांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यासंदर्भातील माहिती त्यांनी पोलिसांनी दिली आहे. याआधी सुद्धा दोन वेळा गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दुसऱ्या मेलमध्ये त्याच्या परिसरातील व्हिडिओ धमकीसोबत जोडण्यात आला आहे. गंभीरने या प्रकरणा संदर्भात दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या घराजवळील सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

गौतम गंभीरला २८ नोव्हेंबरच्या रात्री धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. यावेळी दिल्ली पोलिसांचा उल्लेख देखील त्यामध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कराचीमधून एक मेल गंभीरला पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये गंभीर आणि त्याच्या सर्व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल आयसीस काश्मीरच्या आयडीतून आल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता चौहाण काहीही करू शकत नाही. कारण दिल्ली पोलिसांमध्ये आमच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच तो आम्हाला सर्व माहिती पुरवतो. असं ई-मेलच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

गौतम गंभीरच्या घराजवळील सुरक्षेत वाढ

मागील दोन दिवसांपासून गौतमवर धमकीचं चक्र सुरू आहे. त्यातच पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा ई-मेल पाठवण्यात आला आहे. तो सुदधा आयसीस काश्मीरकडून पाठवण्यात आला आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुढील कारवाई देखील पोलिसांकडून सुरू आहे.

२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या तिकीटावर गौतम गंभीर जिंकून आला होता. त्यानंतर गंभीर प्रत्येक मुद्द्यांवर भाष्य किंवा विधान करू लागला. त्याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांवरही त्याने कित्येकदा टीकाही सोडण्यात आली. त्यानंतर तो चर्चेत आला. गंभीरने सिद्धूला पाकिस्तानचे पंत्तप्रधान इम्रान खान यांचा मोठा भाऊ असं म्हणत पहिले आपल्या मुलांना सीमेवर लढायला पाठवा. त्यानंतर अशी विधानं करा. असं देखील बोलल्याचं सांगितलं जातंय.


हेही वाचा: कुठे गेली शिवशाही, ही तर निजामशाही ; चित्रा वाघ यांची मविआ सरकारवर आगपाखड


 

First Published on: November 28, 2021 4:25 PM
Exit mobile version