मुल आम्हाला द्या; बलात्कार आरोपीच्या कुटुंबीयांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

मुल आम्हाला द्या; बलात्कार आरोपीच्या कुटुंबीयांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

 

नवी दिल्लीः बलात्कारातून जन्माला आलेल्या मुलाचा ताबा आम्हाला द्या, अशा मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांनी ही याचिका केली आहे.

या याचिकेतील मागणी बघून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले. तुमचा मुलगा बलात्कार केल्याप्रकरणी जेलमध्ये आहे. तरी तुम्हाला त्याच्या गुन्ह्यामुळे जन्माला आलेल्या बाळाचा ताबा हवा आहे. ते बाळ आईसोबतच राहणार ना, या कश्या याचिका न्यायालयात येऊ लागल्या आहेत, असा संताप सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केला. तर न्या. पी. एस. नरसिम्हा यांनीही या याचिकेवर आश्चर्य व्यक्त केले. मात्र बाळाचं भलं होत असेल तर काय हरकत आहे, असा अजब युक्तिवाद आरोपीच्या कुटुंबियांनी केला.

दरम्यान, बलात्कारासंदर्भात विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत असतात. सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरु शकतात का या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सहमतीने ठेवलेले शरीर संबंध बलात्कार ठरत नाही, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने एक आरोपीची निर्दोष सुटका केली. या आरोपीला दिल्ली सत्र न्यायालय दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही शि्क्षा कायम केली. मात्र सर्वोच्च न्यायलयाने त्याची शिक्षा रद्द केली. सुटका झालेला आरोपी नईम अहमदवर विवाहाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप होता. यासाठी दोषी धरत दिल्ली सत्र न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने कायम केली होती. या शिक्षेला अहमदने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. अजय रस्तोगी व न्या. बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर अहमदच्या याचिकेवर सुनावणी झाली. विवाहाचे अमिष दाखवून बलात्काराचा केलेला आरोप तथ्यहिन आहे. पीडितेने अहमदकडे पैशांची मागणी केली होती. अहमदने पैसे न दिल्याने त्याला याप्रकरणात अडकण्यात आले आहे, असा दावा खंडपीठासमोर करण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने अहमदची सुटका केली.

First Published on: April 24, 2023 8:49 PM
Exit mobile version