चीनमध्ये करोनापासून बचाव करणाऱ्या कारचा शोध

चीनमध्ये करोनापासून बचाव करणाऱ्या कारचा शोध

चीनमध्ये करोनापासून बचाव करणाऱ्या कारचा शोध

जगभरात सध्या करोनाने थैमान घातले आहे. करोनावर ताबा मिळवण्यासाठी जगभरातून डॉक्टर, संशोधक प्रयत्न करत आहेत. मात्र, व्हॉल्वो आणि लोटस ब्रँड्सची मालकी असणारी चिनी कार उत्पादक गीली कंपनीने करोनावर एक दावा केला आहे. गीली कंपनीने नवी नवीन एसयूव्ही आयकॉन गाडी लॉन्च केली आहे. या गाडीमध्ये एअर फिल्ट्रेशन सिस्टम आहे. ज्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया सारख्या सूक्ष्मजीवांना गाडीमध्ये जाण्यापासून रोखता येऊ शकते. यामुळे कोविड-१९ व्हायरसचादेखील प्रतिबंध होऊ शकतो, असा दावा या कंपनीने केला आहे.

गीली कंपनीने एक नवीन इंटेलिजेंट एअर प्युरिफिकेशन सिस्टम (आयएपीएस) विकसित केली.

हेही वाचा – आमदारच मुली पळवून आणण्याची भाषा करतात – उद्धव ठाकरे

प्राणघातक कोरोनाव्हायरसचा उगम चीनमध्ये झाला. करोनाचा धोका चीनमध्ये जास्त आहे. त्यामुळे यासारख्या कारचे चिनमध्ये खूप स्वागत होईल, असा विश्वास गीली कंपनीने केला आहे. कोरोनाव्हायरसला प्रतिसाद म्हणून, गीली कंपनीने एक नवीन इंटेलिजेंट एअर प्युरिफिकेशन सिस्टम (आयएपीएस) विकसित केली. जी एन-९५ प्रमाणित आहे. गीली म्हणतात की ही अत्यंत कार्यक्षम आहे. एसयूव्हीच्या हवा शुद्धीकरण प्रणालीच्या सहाय्याने जीवाणू (बॅक्टेरीया) आणि व्हायरससह हवेतील हानिकारक घटकांना दूर करते. नवीन एसयूव्ही आयकॉन लॉन्च कार्यक्रमात बोलताना गीली ऑटो ग्रुपचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एन कांगुई यांनी याबाबतची माहिती दिली.

 

First Published on: March 5, 2020 6:55 PM
Exit mobile version