जिओ प्लॅटफॉर्मने सहा आठवड्यांत कमावले ९२,२०२ कोटी रुपये

जिओ प्लॅटफॉर्मने सहा आठवड्यांत कमावले ९२,२०२ कोटी रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीजने अबू धाबीच्या वॉरेन गुंतवणूकदार मुबाडला आणि खासगी गुंतवणूक कंपनी सिल्वर लेक या दोघांकडून डिजिटल संस्था जिओ प्लॅटफॉर्मची भागिदारी विकून १३,६४० कोटी रुपयांची भांडवल जमा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंत सुमारे २० टक्के भागभांडवल विक्रीचे सौदे केले आहेत. यामुळे कंपनीला एकूण ९२,२०२ कोटी रुपये मिळणार आहेत. खासगी गुंतवणूक कंपनी सिल्व्हर लेकने जिओ प्लॅटफॉर्मच्या ०.९३ टक्के भागीदारीसाठी ४.५४६.८० कोटींची नवीन गुंतवणूक केली आहे, असं कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितलं की, आता जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सिल्व्हर लेकद्वारे केलेली एकूण गुंतवणूक १०,२०२.५५ कोटी झाली आहे. सिल्व्हर लेकने यापूर्वी ४ मे रोजी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये १.१५ टक्के भागीदारीसाठी ५,६५५.७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सिल्व्हर लेकची एकूण हिस्सेदारी आता २.०८ एवढी झाली आहे. दुसर्‍या निवेदनात कंपनीने अबू धाबीमधील गुंतवणूक कंपनी मुबाडला कंपनीला १.८५ टक्के भागीदारी ९,०९३.६० कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केली.


हेही वाचा – भयंकर, हत्तीणीनंतर गर्भवती गायीला खाऊ घातले फटाके


या कंपन्यांनी विकत घेतली भागीदारी

फेसबुकने २२ एप्रिल रोजी जियो प्लॅटफॉर्ममधील ९.९९ टक्के भागीदारी खरेदी केली आहे. या करारानंतर काही दिवसांनंतर जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान गुंतवणूकदार असलेल्या सिल्व्हर लेकने ५,६६५.७५ कोटी रुपयात जिओ प्लॅटफॉर्मची १.१५ टक्के भागीदारी खरेदी केली. त्यानंतर, अमेरिकास्थित व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने ८ मे रोजी जिओ प्लॅटफॉर्मची २.३२ टक्के भागीदारी ११,३६७ कोटी रुपयांना खरेदी केली. ग्लोबल इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकने १७ मे रोजी कंपनीने १.३४ टक्के भागीदारी ६,५९८.३८ कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. त्यानंतर अमेरिकन इक्विटी गुंतवणूकदार केकेआरने ११,३६७ कोटी रुपयांमध्ये २.३२ टक्के भागीदारी खरेदी केली.

 

First Published on: June 6, 2020 5:43 PM
Exit mobile version