Coronavirus: कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येणार या चिंतेत जर्मन अर्थमंत्र्याची आत्महत्या

Coronavirus: कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येणार या चिंतेत जर्मन अर्थमंत्र्याची आत्महत्या

जर्मनीत कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येणार या चिंतेत अर्थमंत्र्याची आत्महत्या

कोरोना जगभर थैमान घालत आहे. याचा परिणाम जगातील सर्वच देशांच्या, राज्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. दरम्यान, जर्मनीच्या हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी कोरोना विषाणुपासून होणाऱ्या आर्थिक घसरणीला कसे तोंड द्यावे याने चिंताग्रस्त झाल्याने आत्महत्या केल्याचे राज्याचे मुख्य व्होकर बौफियर यांनी रविवारी सांगितले. शनिवारी रेल्वे रूळाजवळ शेफर (वय ५४) यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा विस्बाडेन फिर्यादी कार्यालयाने केला आहे. त्यांच्या ,पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. या घटनेने आम्हाला धक्का बसल्याचे राज्याचे मुख्य व्होकर बौफियर यांनी म्हटले.

या घटनेनंतर आम्हाला धक्का बसला आहे, आम्हाला आजून विश्वासच बसत नाही आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही अत्यंत दु:खी आहोत, असे व्होकर बौफियर यांनी म्हटले आहे. थॉमस स्चेफर १० वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते. अर्थव्यवस्थेची थॉमस शेफर यांना खूप चिंता होती हे यातून दिसून येते, असे बौफियर म्हणाले. या कठीण काळात आम्हाला त्यांच्यासारख्या व्यक्तीची गरज भासत आहे.


हेही वाचा – Coronavirus: वास, चव न येणे कोरोनाची सर्वात पहिली लक्षणं


जर्मनीतील आर्थिक राजधानी फ्रँकफर्ट हेसे येथे आहे. जेथे ड्यूश बँक आणि कॉमर्सबँक सारख्या प्रमुख बँकांचे मुख्यालय आहे. युरोपियन सेंट्रल बँक देखील फ्रँकफर्ट येथे आहे. जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५८,२४७ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनाचे ४५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या जास्त असली तरी देखील मृतांची संख्या कमी आहे.

 

First Published on: March 29, 2020 6:44 PM
Exit mobile version