उत्तर प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

उत्तर प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

उत्तर प्रदेशमधील मोदीनगरमध्ये रविवारी दुपारी बखरवा गावातील फटाका कारखान्याला आग लागली. आगीचं कारण अद्याप कळालेलं नाही, मात्र आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. सध्या मिळालेल्या माहितीनुसार सहा जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आगीत २० लोक अडकल्याचं सांगितलं जात आहे.

स्थानिक लोकांनी धाडस करत १० लोकांना बाहेर काढलं. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात महिला काम करतात. सध्या प्रशासन पीडितांची ओळख पटवण्यात आणि मदतकार्यात गुंतलं आहे. कारखान्याला आग लागताच लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग विझविली आणि आत अडकलेल्यांना वाचवायला सुरुवात केली. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यात बर्‍याच दिवसांपासून येकाम सुरु होतं.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा


कारखान्यात बर्थडे पार्टीत वापरली जाणारी फुलजारी तयार करण्याचं काम सुरु होतं. यासह हे देखील समोर आलं की मालक जवळपासच्या घरात कच्चा माल पाठवून फटाके बनवत असे. पोलिसांच्या भीतीमुळे असं काम केलं जात असल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितलं. लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता. तथापि, याबाबतची खरी माहिती समोर येणं बाकी आहे. त्याचवेळी, मृतदेह ताब्यात घेऊ न देण्यावर गावकरी ठाम आहेत आणि अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यासाठी आंदोलन करत आहेत. सध्या घटनास्थळी गोंधळ सुरू आहे.

 

First Published on: July 5, 2020 6:09 PM
Exit mobile version