घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा

पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आलं. आज रविवार सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात पोहचले होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तथापि, राष्ट्रपती भवनाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांच्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली असं राष्ट्रपती भवनकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच लडाख दौरा करुन आले आहेत. यावेळी त्यांनी जखमी जवानांची भेट घेतली होती. शिवाय, सीमेवरील परिस्थितीचा प्रत्यक्षपणे अंदाजही घेतला होता. तसंच, जवानांचं मनोबल वाढण्यासाठी त्यांना मार्गदर्शनही केलं होतं. सीमावादाच्या मुद्यावरून भारत-चीन दरम्यान सध्या निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, पाकिस्तान सीमेवरील वाढती घुसखोरी यासह देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी अनेक संकटं भारतासमोर उभी ठाकली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गेल्या २४ तासात बीएसएफचे ३६ जवान कोरोना पॉझिटिव्ह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -