बिहार बेगुसराय गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून चार टीम तैनात; ठिकठिकाणी छापेमारी

बिहार बेगुसराय गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून चार टीम तैनात; ठिकठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली : बिहराच्या बेगुसरायमध्ये 11 जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 10 गंभीर जखमी आहेत. मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. गोळीबाराच्या घटनेपासून परिसरात मोठ्या तणावाचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण भीतीपोटी घराबाहेर पडणं टाळत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात असून अद्याप गुन्हेगारांचा शोध घेण्यात यश आले नाही. या घटनेच्या तपासासाठी आता पोलिसांनी चार टीम तैनात केल्या असून तुरुंगातून सुटलेल्या सर्वांची ओळख पटवली जात आहे. यातील सर्व संशयितांचा शोध घेतला जात आहे. पेट्रोलिंग गाड्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यात 7 वाहनांची कमतरता आढळून आल्याने वाहनचालक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमर यांनी दिली आहे.

बेगुसरायचे एसपी म्हणाले की, कालच्या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 4 टीम तयार केल्या आहेत. शेजारील जिल्ह्यातील सर्व संशयास्पद ठिकाणी पोलिसांच्या टीम छापेमारी करत आहे. तसेच ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरु आहे. काल रात्री पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करत सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. दरम्यान काल रात्रीपासून 5 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. प्राप्त झालेल्या सर्व इनपुटवर काम करत असून यात सापडलेल्या फोटोंमध्ये दोन दुचाकींवर चार जण बसले असून त्यांनी हा गुन्हा केला आहे. याप्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत, मात्र दोषी सापडत नाहीत.

या घटनेवर माजी मुख्यमंत्री शशिल कुमार मोदी म्हणाले की, बिहारच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. दोन बाईकवरून आलेल्या गुन्हेगारांनी 11 जणांवर गोळ्या झाडल्या मात्र पोलीस काहीही करू शकले नाहीत. एकाचा मृत्यू झाला, तर 10-11 जण जखमी झाले. या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे राजीनामा मागितला आहे.

चौबे म्हणाले की, महाआघाडीचे सरकार आल्याने गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. आरजेडी आणि जेडीयू सत्तेत आल्यानंतर लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. बेगुसरायमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी बेगूसराय बंदची हाक दिली आहे. भाजपने आज जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन केले.


सन्मानासाठी शबनमची झाली शिवानी; मुस्लीम मुलीच्या हिंदू विवाहास कोर्टाची मान्यता


First Published on: September 14, 2022 4:42 PM
Exit mobile version