सिमेंटचे ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट; ९ जण जखमी

सिमेंटचे ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट; ९ जण जखमी

सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट

गोव्यामध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गोव्याच्या ट्वेम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सिमेंटच्या ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत दुपारी अचाकन स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ कामगार जखमी झाले असून त्यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतर फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हा स्फोट ऐवढा भीषण होता की या स्फोटामुळे कंपनीच्या भिंतींना तडे गेले आहेत.

सिमेंटच्या ब्लॉक बनवण्याच्या कंपनीमध्ये दुपारी अचानक स्फोट झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीमध्ये कामगार उपस्थित होते. या स्फोटामध्ये ९ कामगार जखमी झाले तर तीन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. जखमी झालेल्या सर्व कामगारांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे तर कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे.

First Published on: January 12, 2019 5:04 PM
Exit mobile version