Goa CM: गोव्यात २.० मिशनला सुरूवात करणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच घेतला मोठा निर्णय

Goa CM: गोव्यात २.० मिशनला सुरूवात करणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच घेतला मोठा निर्णय

गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी सावंत यांना गोपनियतेची शपथ दिली आहे. तसेच या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. परंतु गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारताच गोव्यात २.० मिशनला सुरूवात करणार असल्याची मोठी घोषणा प्रमोद सावंत यांनी केली आहे.

गोव्यात २.० मिशनला सुरूवात करणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीमध्ये आपला कार्यभार सांभाळला. तसेच आता स्वयंपूर्ण गोवा २.० मिशनला सुरूवात करणार आहोत, असं प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा २.० मिशनला सुरूवात करणार आहोत, सर्व क्षेत्रात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्यात पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करू, असं प्रमोद सावंत म्हणाले.

राज्यपाल राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी २९ मार्चपासून दोन दिवसांचं विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रमोद सावंत बहुमत सादर करणार आहेत. तसेच गोवा विधानसभेच्या अध्यक्षांचीही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवड होणार आहे.

दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला

२०१७ साली भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वात भाजपनं सरकार स्थापन केलं होतं, त्यावेळी त्यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर मार्च २०१९ मध्ये त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. प्रमोद सावंत यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे.

गोव्यामध्ये भाजपला घवघवीत यश

देशाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर गोव्यातही भाजपने सत्ता स्थापन केली. गोव्यात भाजपने ४० पैकी २० जागा जिंकल्या आहेत. भाजपला तीन अपक्ष आणि दोन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा निवडणुकीचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे.


हेही वाचा : Tanaji Sawant : राष्ट्रवादी, काँग्रेसवाले फक्त आमच्यावर बघून हसतात आणि चेष्टा करतात, शिवसेनेच्या निधी वाटपावर तानाजी सावंतांची नाराजी


 

First Published on: March 28, 2022 5:15 PM
Exit mobile version