घरताज्या घडामोडीTanaji Sawant : राष्ट्रवादी, काँग्रेसवाले फक्त आमच्यावर बघून हसतात आणि चेष्टा करतात,...

Tanaji Sawant : राष्ट्रवादी, काँग्रेसवाले फक्त आमच्यावर बघून हसतात आणि चेष्टा करतात, शिवसेनेच्या निधी वाटपावर तानाजी सावंतांची नाराजी

Subscribe

शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. २०१९ पासून ते आजपर्यंत पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक वाक्य केलेलं दाखवावं. मी आहे तसा आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याच्या मनगटातली रग ही वेगळीच आहे. कुठल्याही पक्षाने आजमवण्याचा प्रयत्न करू नये आणि भविष्यातही करू नये. दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेसवाले फक्त आमच्यावर बघून हसतात आणि सर्व आमदारांची चेष्टा करतात, असं माजी मंत्री तानाजी सावंत म्हणाले.

निधीवाटपावरून तानाजी सावंतांची नाराजी

अधिवेशन पार पडल्यानंतर गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये असं समजतंय की, शिवसेनेला कुठेतरी दुय्यम वागणूक मिळत आहे. हे अर्थसंकल्पातून रिफ्लेक्ट झालेलं आहे. अर्थसंकल्पात ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादीला दिलं जातं. तर ३० ते ३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं. तसेच शिवसेनेला १६ टक्के बजेट दिलं जातं. परंतु १६ टक्के बजेट मधील उच्च आणि तंज्ञ शिक्षण मंत्री आमचे असल्यामुळे पगारावरतील ६ टक्के दिलं जातंय. पण विकासासाठी काय?,विकासासाठी फक्त १० टक्के दिलं जातं, अशी नाराजी सावंतांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी, काँग्रेसवाले आमच्यावर बघून हसतात

आमच्या विभागामध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी पाहीजेत ते आम्हाला मिळत नाहीत. आम्हाला यांच्याकडं बघावं लागतं आणि हे गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. त्यामुळे या पक्षांवर आमची प्रचंड नाराजी आहे. हे जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली. तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादी लागू नाका. तुम्ही शंभर मारले तर आमचा एकच दणकट बसलं की तुम्हाला आईचं दूध आठवेल. आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही बघू नका, असं तानाजी सावंत म्हणाले.

- Advertisement -

आमची घडी विसकटण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही आणि खासदाराचा विषयचं येत नाही. आमच्यामुळे हे सत्तेमध्ये आले आणि आमच्या मांडीला मांडी लावून बसले. परंतु आमची घडी विसकटण्याचा प्रयत्न तुम्ही करता. हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट बघत आहोत. जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. आमच्या संयमाची तुम्ही परीक्षा करू नका. जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही. तोपर्यंत शांत आहोत, असं सावंत म्हणाले.


हेही वाचा : Goa: प्रमोद सावंत पुन्हा झाले गोव्याचे मुख्यमंत्री, 8 मंत्र्यांनी घेतली शपथ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -