दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किमती घसरल्या, जाणून घ्या आजचे दर

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किमती घसरल्या, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६ हजार ५०० रुपये आहे. तर, चांदी ५६ हजार ९०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ५० हजार ७३० प्रति ग्रॅम आहे. ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदीचे दागिने घेण्याची प्रथा आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली तर, येत्या दसऱ्याला विक्रमी सोने खरेदी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये असेल. नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६९ रुपये आहे.

सरकारने आयात शुल्क वाढवले ​

सरकारने अलीकडेच सोन्याच्या आयातीवरील मूळ आयात शुल्क 12.5 टक्के केले. यापूर्वी त्याचा दर 7.5 टक्के होते. भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारताला आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी सोने आयात करावे लागते. कच्च्या तेलानंतर सोने हा भारताच्या आयात बिलातील सर्वात मोठा घटक आहे. सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जागतिक बाजारात किमती कमी झाल्याने भारतातही सोने स्वस्त होत आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

First Published on: October 2, 2022 10:28 AM
Exit mobile version