गूडन्युज! सलग चौथ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण

गूडन्युज! सलग चौथ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण

सोन्याचे दर

सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमतीत ४८५ प्रति १० ग्रॅमने घसरल्याचे दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये गुरुवारी सोन्याची प्रति १० ग्रॅमची किंमत ५० हजार ४१८ रुपये झाली आहे. मागील सत्रात सराफा बाजार बंद होताना सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५० हजार ९०३ रुपये होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, ‘दिल्लीमध्ये सलग चौथ्या सत्रात २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ४८५ रुपयांची घट झाली आहे.’

पुढे पटेल म्हणाले की, ‘कोरोनाबाधितांची संख्येत वाढ झाल्यामुळे युरोपमधील सामान्य आर्थिक घसरणीदरम्यान डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाची किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.’

चांदीची किंमत

चांदीच्या किंमतीत २ हजार ८१ प्रति किलोग्रॅम घट झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ५८ हजार ९९ रुपयांवर पोहोचली आहे. याच्या मागील सत्रात चांदीची किंमत ६० हजार १८० रुपये प्रति किलोग्रॅम होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसत आहे आणि १,८५४ डॉलर प्रति ग्रॅम पातळीवर सोन्याची किंमत होती. तर चांदीची किंमत २२.१२ डॉल प्रति ग्रॅमवर होती.


हेही वाचा – सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण


 

First Published on: September 24, 2020 5:17 PM
Exit mobile version