सोन्याची झळाळी; १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

सोन्याची झळाळी;  १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याचे भाव वधारले असून सोन्याने ३४ हजार ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा जून महिन्यातील दर पाहता १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून येत्या काही दिवसांत दर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरात ३ हजार रुपयांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.

१९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

१९ वर्षांपूर्वी जून महिन्यात सोन्याचा दर १ हजार ४३० डॉलरवर जाऊन पोहोचला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास भारतात सोन्याचा दर जवळपास ६ डॉसरने कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सुरु आहे. याशिवाय जूनमध्ये अमेरिकन डॉलरचे मूल्य देखील घटले आहे. यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे एंजल ब्रोकिंग अनुज दत्ता यांनी सांगितले आहे. जगभरात मंदीसदृश्य स्थिती आहे. याशिवाय व्यापरयुद्धदेखील जोरात सुरु असून अमेरिकेतील बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदी सुरु केली आहे.


हेही वाचा – सोन्याचे भाव गडगडले

हेही वाचा – रेल्वे प्रवाशाकडे सापडले १७ किलो सोन्याचे घबाड


 

First Published on: June 26, 2019 1:34 PM
Exit mobile version