खुशखबर! सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

खुशखबर! सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

सोनं

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांत सोन्यामध्ये दिवसेंदिवस मोठी घसरण पाहायला मिळालेली नव्हती. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोन्याचा भाव २३८ रुपयांनी घसरुन ४९ हजार ६६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर सोन्यासह चांदीच्या दरात देखील मोठी घट झाल्याची पाहायला मिळाली. चांदी जवळपास १ टक्क्यांनी घसरुन ५९ हजार ०१८ रुपये प्रतिकिलो आली आहे. त्यामुळे सोने २ हजार रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीतही ९ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्यामध्ये आठवड्याभरात सोन्याच्या किमती दहा ग्रॅमसाठी सुमारे २ हजार रुपयांनी घसरल्या. तर चांदी प्रति किलो ९ हजारांपेक्षा स्वस्त झाली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, सोन्याची किंमत ४९ हजार २५० च्या खाली येत आहे, म्हणजे आजा ते प्रति १० ग्रॅम ४८ हजार ९०० ते ४८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान व्यापर करेल.

१५ टक्क्यांनी चांदी झाली स्वस्त

जागतिक बाजारात सोन्या-चांदीची सर्वात मोठी घसरण ही मार्चनंतर दिसून आली आहे. तर गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ४.६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर चांदीही १५ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.


हेही वाचा – उत्तीर्ण झालेले डॉक्टर जळगावात देणार वर्षभर सेवा


 

First Published on: September 26, 2020 6:29 PM
Exit mobile version