Gold-Silver Price Today: सोनं-चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर

Gold Price Today: ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरांतही घसरण

सोनं-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज, गुरुवारी सोनं-चांदीच्या दरात जोरदार घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (Indian Bullion and Jweller Association) नुसार, आज ९९९ शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १५४ रुपयांची घसरण झाली असून ४७ हजार २९४ रुपये प्रति १० ग्रॅम सोनं झालं आहे. तर हेच सोन्याचे दर काल, बुधवारी ४७ हजार ४४८ रुपये प्रति १० ग्रॅम होते.

आज सोन्याच्या दरासोबत चांदीचे दर देखील घसरले आहेत. चांदीमध्ये ७६ रुपयांची घसरण झाली असून ९९९ शुद्धता असलेल्या चांदीचे दर ६३ हजार ३०६ रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. यापूर्वी बुधवारी चांदीची दर ६३ हजार ३८२ प्रति किलोग्रॅम झाले होते.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

जर तुम्ही सोनं खरेदी करू इच्छित आहात, तर आज बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर ४ हजार ७२९ रुपये प्रति एक ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४ हजार ३३२ रुपये प्रति एक ग्रॅम आहे.

एका मिस्ड कॉलमध्ये जाणून घ्या सोन्याचे दर

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्याचे दर जाणून घेण्यासाठी ८९५५६६४४३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्या. काही वेळात तुम्हा मॅसेजद्वारे सोन्याचे दर सांगितले जातील. शिवाय सोन्या-चांदीच्या दराचे वेळोवेळी अपडेट जाणून घेण्यासाठी https://ibjarates.com/ या वेबसाईटवर जा.


हेही वाचा – सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार पगाराच्या ३० टक्के समान पेन्शन 


 

First Published on: August 26, 2021 3:40 PM
Exit mobile version