घरताज्या घडामोडीसरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार पगाराच्या ३० टक्के समान पेन्शन

सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार पगाराच्या ३० टक्के समान पेन्शन

Subscribe

कोरोना महामारी असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकत्रित कामगिरी चांगली आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पगाराच्या ३० टक्के समान पेन्शन मिळणार आहे.

३० ते ३५ हजारांपर्यंत कौटुंबिक पेन्शन

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता मृत बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारे पेन्शन ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत असेल. पूर्वी ९२८४ रुपयांची कॅप होती. वित्त सेवा सचिव देवाशीष पांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दोन दिवशीय मुंबई दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजाचा वार्षिक आढावा घेतला. याचदरम्यान त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला.

NPS मध्ये वाढेल ४० टक्के योगदान

केंद्र सरकारने सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे पेन्शन फंडातील योगदान देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पेन्शन सिस्टीम (NPS) अंतर्गत, सरकार स्वतः बँक कामगारांच्या पेन्शन फंडात १० टक्के आणि सरकारी बँकांमध्ये म्हणजेच नियुक्त्यांमध्ये १० टक्के योगदान देणार आहेत. आता बँकांकडून मिळणाऱ्या योगदानात ४० टक्क्यांपर्यंत वाढवून १४ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

‘एक जिल्हा, एक निर्यातदार’ ला पाठींबा

यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सर्व सरकारी बँकांनी आता राज्य सरकारसोबत काम करायचे आहे. जेणेकरून ‘एक जिल्हा, एक निर्यातदार’ चा अजेंडा पुढे नेता येईल. तर दुसरीकडे, ईशान्येकडील राज्यांना बँकांसाठी वेगवेगळ्या  योजना तयार करण्यास सांगितले आहे.

लॉजिस्टिक आणि निर्यात क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यास देखील आहे. या व्यतिरिक्त त्यांनी बँकांना वेगाने वाढणाऱ्या फिनटेक क्षेत्राला देखील पाठिंबा देण्याविषयी सांगितले आहे.

कोरोनातही सार्वजनिक बँकांची कामगिरी दमदार

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोरोना महामारी असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकत्रित कामगिरी चांगली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका PCA च्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरणही सोप्पे झाले असून त्यांचा फायदा होत आहे.


हेही वाचा : तालिबान्यांचा यू टर्न, अफगाणि इंजिनियर, डॉक्टरांना देश सोडण्यास मनाई


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -