सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

Gold Price Today:

बऱ्याचदा जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा सोन्या-चांदीच्या किंमती वाढतात. पण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत आहे आणि त्याचबरोबर सोन्या-चांदीच्या किंमती देखील घसरत आहेत. मंगळवारी देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट झाली.

मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ६७२ रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण होताच दिल्लीमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१ हजार ३२८ रुपये झाली आहे. सोमवारी प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२ हजार रुपयांच्या वर होती. सोन्यापेक्षा चांदीमध्ये जास्त घसरण झाली आहे. मंगळवारी प्रति किलोग्रॅम चांदीची किंमत ५ हजार ७८१ रुपयांनी घसरली. यामुळे चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ६१ हजार ६०६ रुपयांवर आली आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घट होत आहे. याशिवाय डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. मंगळवारी स्थानिक बाजारातील नकारात्मक प्रवृत्तीमुळे भारतीय रुपया एका डॉलरच्या तुलनेत ७३.४८ पैसेवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, मंगळवारी सोन्याची किंमत प्रति किलोग्रॅम १ हजार ९०९ डॉलर घट झाली आहे. दरम्यान युरोप आणि यूकेमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे गुंतवणूकदार एक सुरक्षित आश्रयस्थान म्हणून डॉलरकडे वळले आहेत.

गेल्या एक महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. ऑगस्टमध्ये प्रति १० ग्रॅम ५७ हजार रुपये इतके वाढले होते. कोरोना संकट काळात सोन्याची किंमत खूप वाढली होती. डिसेंबर २०१९मध्ये सोन्या किंमत ४१ हजार रुपयांच्या आसपास होती, आता ५१ हजार रुपयांच्या वर आहे.


हेही वाचा – बाबो! २०१५ पासून पंतप्रधान मोदींनी ५८ देशांचे दौरे केले, वाचा एकूण खर्च


 

First Published on: September 22, 2020 10:33 PM
Exit mobile version