घरदेश-विदेशबाबो! २०१५ पासून पंतप्रधान मोदींनी ५८ देशांचे दौरे केले, वाचा एकूण खर्च

बाबो! २०१५ पासून पंतप्रधान मोदींनी ५८ देशांचे दौरे केले, वाचा एकूण खर्च

Subscribe

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अनेक विदेश दौरे केले आहेत. मात्र, या दौऱ्यांवर किती खर्च झाला याबाबतची माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, आज संसदेत परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत खासदारांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देत ही माहिती दिली. २०१५ पासून आतापर्यंत ५८ देशांचा दौरा केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१५ पासून ते आतापर्यंतच्या दौऱ्यावर ५१७.८२ कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीदरम्यान, भारताने अनेक देशांशी करार केले. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण यासह मोठ्या क्षेत्रात सामंजस्य करारही झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या महामारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरा केलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतर एकही विदेशी नेत्याचा भारत दौरा झालेला नाही. कोरोनापासून पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परराष्ट्र नेत्यांशी संपर्क साधत आहेत. तसंच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करणार आहेत.

- Advertisement -

परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत माहिती दिली आहे की कोरोना संकटाच्या वेळी भारताने बर्‍याच देशांना मदत केली आहे. एकूण १५० देशांना औषधे, वैद्यकीय उपकरणांची मदत दिली आहे. चीनसह ८० देशांना ८० कोटींचे अनुदान देण्यात आलं आहे. यावेळी जपान, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राईलकडूनही भारताला मदत मिळाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -