Indian Army jobs : भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी, १० वी पासना थेट ६३००० रुपयांपर्यंत पगार

Indian Army jobs : भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी, १० वी पासना थेट ६३००० रुपयांपर्यंत पगार

भारतीय सैन्यात भरती होऊन आपल्या देशाची सेवा करण्यासाठी स्वप्न बघणाऱ्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इंडियन आर्मीने आर्टिलरी भरती २०२२ चं नोटिफिकेशन जारी केलं आहे. सेना भरती २०२२ मोहिमेद्वारे, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मॉडेल वर्कर, कारपेंटर , कुक, रेंज लष्कर, फायरमॅन यांसह विविध पदांसाठी एकूण १०७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांनी मागील जाहिरातींच्या आधारे या पदांसाठी अर्ज केले आहेत ते अपात्र आहेत, त्यांना ताज्या अधिसूचनेनुसार नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

पदांविषयी जाणून घ्या माहिती –

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) – २७ पदं
मॉडेल मेकर – १ पद
कारपेंटर – २ पदं
कूक – २ पदं
रेंज लष्कर – ८ पदं
फायरमॅन – १ पद
आर्टी लष्कर – ७ पदं
केश भूषाकार – २ पदं
वॉशरमन – ३ पदं
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ४६ पदं
साईस – १ पद
एमटीएस लष्कर – ६ पदं
उपकरणे दुरुस्त करणारे – १ पद

दरम्यान, एकूण १०७ पदासांठी भारतीय सेनेत भरती करण्यात येणार आहे.

कोण करू शकतं अर्ज ?

कोणत्याही बोर्डातून १० वी किंवा १२ वी परीक्षा पास झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. एलडीसीच्या पदासाठी १२ वी पास होण्यासोबतच इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंगची गती आवश्यक आहे.


हेही वाचा : जागतिक स्तरावरील प्रश्न गंभीर ; पण भारत खंबीर


 

First Published on: December 30, 2021 5:54 PM
Exit mobile version