कोरोना व्हायरसचं पुन्हा होणारं संक्रमण आणि इम्यूनिटीसंदर्भात दिलासादायक बातमी

कोरोना व्हायरसचं पुन्हा होणारं संक्रमण आणि इम्यूनिटीसंदर्भात दिलासादायक बातमी

जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. हाँगकाँग, इटली आणि अमेरिकेत सध्या परिस्थिती सुधारल्यानंतर कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा एकाच व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे प्रकरणे वाढत आहेत, तर दुसरीकडे रोग प्रतिकारशक्तीबद्दल लोकांच्या मनातही प्रश्नही उपस्थित होत आहेत. मात्र एका नवीन अभ्यासानुसार लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

आयलंड या बेटावरील लोकांवरील करण्यात आलेला हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार पुन्हा होणारं कोरोनाचं संक्रमण आणि प्रतिकारशक्तीबद्दल लोकांच्या मनात येणारी शंका दूर करण्यात आली आहे. अभ्यासासाठी, संशोधकांनी ३० हजार ५७६ लोकांकडून सीरमचे नमुने गोळा केले आणि सहा वेगवेगळ्या प्रकारच्या अॅन्टीबॉडीजची चाचणी केली. संशोधकांना असे आढळले आहे की कोरोनापासून बरे झालेल्या १,७९७ लोकांपैकी ९१.१ टक्के लोकांमध्ये अॅन्टीबॉडीचे प्रमाण चांगले आहे.

अभ्यासानुसार असे म्हटले आहे की अॅन्टीबॉडीजच्या पातळीत कोणतीही घट चार महिन्यांपर्यंत दिसून आली नाही. वृद्ध लोकांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसाद जास्त असल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू केवळ सर्वात गंभीर मार्गाने वृद्धांवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत, वृद्धांमध्ये अधिक प्रतिकारशक्ती असणे ही नक्कीच चांगली बातमी आहे. प्रभावी लस अधिक प्रतिकार शक्ती निर्माण होणं ही देखील चांगली बातमी आहे.

संशोधनात केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे ७० टक्के लोकांमध्ये अॅन्टीबॉडीज असणे आवश्यक आहे. या अभ्यासात या बेटाच्या लोकसंख्येच्या १ टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये कोरोना विषाणू आढळला. पहिल्या संसर्गापेक्षा दुसऱ्यांदा होणारा कोरोनाचा संसर्ग खूप सौम्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहिल्यांदा कोरोना झाल्याने शरिरात व्हायरसविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे दुसऱ्यांदा कोरोना झाल्यास त्या विषाणूला हरवण्यास मदत होते.

या संशोधनानुसार असे सांगितले जात आहे की, कोरोनाचा पुन्हा संक्रमण झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. तर कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात निर्माण होणाऱ्या लसीकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे.


‘Kill Narendra Modi’; NIA कडे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा E-Mail

First Published on: September 4, 2020 1:38 PM
Exit mobile version