खुशखबर: ऑक्सफोर्डची कोरोना लस अंतिम टप्प्यात; सहा आठवड्यांची प्रतिक्षा

खुशखबर: ऑक्सफोर्डची कोरोना लस अंतिम टप्प्यात; सहा आठवड्यांची प्रतिक्षा

संपूर्ण जगाचे लक्ष असलेली ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीची कोरोना लस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली असून अवघ्या ४२ दिवसात म्हणजेच सहा आठवड्यांमध्ये ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीची कोरोना लस तयार होण्याची शक्यता. याबाबतचा अहवाल express.co.uk छापून आला आहे. express.co.uk मध्ये छापून आलेल्या अहवालानुसार ब्रिटेन सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि इंपेरियल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक लसीच्या जवळ पोहोचले आहेत.

दरम्यान, ब्रिटनमध्ये लसीच्या उत्पादनाची तयारी पहिल्यापासून सुरु आहे. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यानंतर ब्रिटनच्या नागरिकांना अत्यंत कमी वेळात लस मिळू शकेल. मात्र ब्रिटेनच्या मंत्र्यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. लसीच्या टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले की, लसीबाबत आशावादी आहोत. ते म्हणाले की सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण काम करीत राहायला हवे. आततायीपणे कुठल्याही गोष्टीच्या शेवटापर्यंत पोहोचायला नको. नाताळाच्यापूर्वी लसीच्या ट्रायलचा निकाल समोर येईल, अशी आशा देखील त्यानी बोलून दाखवली आहे.

 

First Published on: August 30, 2020 7:12 PM
Exit mobile version