पहिल्या रेडिओ मेसेजच्यानिमित्ताने गुगलचे खास ‘डुडल’

पहिल्या रेडिओ मेसेजच्यानिमित्ताने गुगलचे खास ‘डुडल’

रेडिओ मेसेजच्या ४४ वर्षानिमित्त गुगलचे खास डुडल

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. गुगलने आज पहिल्या रेडिओ मेसेजच्या ४४ वर्षानिमित्त गुगलचे खास डुडल तयार केले आहे. आजच्या दिवशी पहिल्यांदा माणसाने पृथ्वीबाहेर पहिला रेडिओ मेसेज पाठवला होता. वैज्ञानिकांच्या एका समुहांने Puerto Rico जंगलातील अरसिबो ऑब्जर्वेटरी येथे एकत्र जमले आणि त्यांनी पहिल्यांदा पृथ्वी बाहेर रेडिओ मेसेज पाठवण्यात आला. आज त्याला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत.

३ मिनिटाचा रेडिओ मेसेज

हा रेडिओ मेसेज तीन मिनिटांचा होता. या मेसेजमध्ये १ हजार ६७९ बायनरी डिजिट्स होते. ज्यामध्ये २३ क़मल आणि ७३ ओळींचा समावेश होता. तर या नंबरच्या सिरीजचे लक्ष्य पृथ्वीपासून M – १३ लाख २५ हजार प्रकाशवर्ष दूर स्थित असलेला तारकांचा समूह होता. तर हे ब्रॉडकास्ट खूप शक्तीशाली होते. कारण यात ३०५ मीटर एंटिनाला जोडणाऱ्या अरसीबोचे मेगावॉट ट्रान्समीटरचा उपयोग करण्यात आला होता. तर अरसीबोद्वारे अलिकडे करण्यात आलेल्या रेडिओ टेलिस्कोपच्या क्षमता प्रदर्शित करणे हा या ट्रान्समिशनचा मुख्य उद्देश होता.

२५ हजार वर्षांचा लागला कालावधी

अरसीबो मेसेजला आपल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी प्रचंड वेळ लागला. या मेसेजला पोहोचण्यासाठी तब्बल २५ हजार वर्षांचा कालवधी लागला होता. अजूनपर्यंत हा अरसीबो मेसेज फक्त २५९ ट्रिलियन माइल पर्यंत पोहोचला आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – पाहा: ‘गुगल’ची खास इंडियन डुडल्स!

First Published on: November 16, 2018 10:20 AM
Exit mobile version