Chickenpox: कांजण्याच्या लसीचे संशोधक डॉ. Dr. Michiaki Takahashi यांचा वाढदिवस, गूगलचे स्पेशल डूडल

Chickenpox: कांजण्याच्या लसीचे संशोधक डॉ. Dr. Michiaki Takahashi यांचा वाढदिवस, गूगलचे स्पेशल डूडल

जपानी वायरॉलॉजिस्ट डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्मदिवस आज गूगल डूडल्सद्वारे साजरा करत आहे. डॉ. मिचियाकी यांनी विज्ञान क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावल्याचे म्हटले जाते. १९२८ साली जपानाच्या ओसाका येथे ताकाहाशी यांचा जन्म झाला. १९७४ साली काजण्यांवर प्रतिबंधात्मक लस तयार करणारे मिचियाकी ताकाहाशी हे पहिले व्यक्ती होते. त्यामुळे आज जगभरातील लोकं त्यांचे आभार व्यक्त करतं आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने गुगलकडूनही ताकाहाशी यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

ताकाहाशी यांनी कांजण्यावर लस तयार केली होती. ‘ओका’ असे या लसीचे नाव होते. जागतिक आरोग्य संघटनेने ही लस स्वीकारली होती. जगभरात व्यापक रुपात या लसीचा वापर केला जात आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रसार आणि गंभीर रुग्ण रोखण्यासाठी डॉ. ताकाहाशी यांची लस प्रभावी होती.

डॉ. ताकाहाशी यांनी ओसाका महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळवली आणि त्यानंतर १९५९ मध्ये ओसाका महाविद्यालयातून मायक्रोबियल रोग संशोधन संस्थेत संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. डॉ. ताकाहाशी यांनी गोवर आणि पोलिओचा अभ्यास केल्यानंतर १९६३ साली बायलर कॉलेजमध्ये एक संशोधन फेलोशिप स्वीकारली. याच दरम्यान त्यांच्या मुलाला कांजण्यांचा गंभीर त्रास होऊ लागला होता. यामुळे त्यांनी अत्यंत संसर्गजन्य आजाराशी लढा देण्यासाठी दिशा बदलली. त्यांनी कांजण्यावर प्रतिबंधात्मक लस शोधली. १६ डिसेंबर २०१३ रोजी ताकाहाशी यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.


हेही वाचा – स्टेम सेल प्रत्यारोपणानंतर जगात पहिल्यांदा महिला रुग्ण झाली HIV मुक्त


 

First Published on: February 17, 2022 8:57 AM
Exit mobile version