घरदेश-विदेशस्टेम सेल प्रत्यारोपणानंतर जगात पहिल्यांदा महिला रुग्ण झाली HIV मुक्त

स्टेम सेल प्रत्यारोपणानंतर जगात पहिल्यांदा महिला रुग्ण झाली HIV मुक्त

Subscribe

एचआयव्ही एड्स रुग्णांसाठी एक मोठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे. आत्तापर्यंत एचआयव्ही हा आजार केव्हाच बरा होऊ शकत नाही असं एक समज होता, मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एचआयव्ही रुग्ण आता एड्समुक्त होत असल्याचे समोर आले आहे. स्टेम सेल प्रत्यारोपण उपचारानंतर अमेरिकेत एक महिला रुग्ण एचआयव्हीपासून मुक्त झाली आहे. एचआयव्हीमुक्त झालेली ही जगातील पहिलाच महिला रुग्ण आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एचआयव्हीबाधित महिलेवर स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे उपचार करण्यात आले होते. एचआयव्हीच्या विषाणूविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार असलेल्या व्यक्तीने स्टेम पेशी दान केल्या होत्या. त्याच पेशी महिलेच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आल्या. यानंतर महिलेची चाचणी करण्यात आली. त्यावेळी महिलेची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच उपचारानंतर गेल्या 14 महिन्यांपासून महिलेची प्रकृती सुधारत आहे. मात्र एचआयव्हीमुक्त होणारी ही जगातील पहिलीच महिला आहे. यापूर्वी दोन पुरुष रुग्ण एचआयव्हीमुक्त झाले आहेत.

- Advertisement -

संबंधित एचआयव्हीमुक्त महिलेला 2013 मध्ये एचआयव्हीचा संसर्ग निदान झाले होते. त्यानंतर चार वर्षांनी तिला रक्ताचा कॅन्सर झाला. रक्ताच्या कॅन्सरमुळे तिच्यावर हॅप्लो-कॉर्ड प्रत्यारोपणाद्वारे उपचार करण्यात आले. यात 2017 मध्ये शेवटचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. यानंतर गेल्या 4 वर्षात ती पूर्णपणे बरी झाली. प्रत्यारोपणाच्या तीन वर्षांनंतर डॉक्टरांनी तिचे एचआयव्हीवरील उपचार बंद केले आहेत.

कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिसच्या डॉ. यव्होन ब्रायसन आणि बॉल्टिमोरमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डॉ. डेबोराह परसॉडय यांच्या टीमकडून यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनात 25 एचआयव्हीग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. यात रुग्णांना कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी प्रथम केमोथेरपीद्वारे उपचार केले जात आहे. यानंतर विशिष्ट अनुवांशिक व्यक्तींकडून स्टेम पेशींचे प्रत्यारोपण केले जाते. यानंतर या व्यक्तीच्या शरीरात एचआयव्हीला प्रतिरोधक प्रतिकारशक्ती विकसित होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

- Advertisement -

Mumbai-Nagpur Bullet Train : मुंबई ते नागपूर प्रवास ३.३० तासात होणार, बुलेट ट्रेनचे काम लवकर सुरु होण्याची शक्यता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -