Cyber Strick: रशियाला पुन्हा एकदा मोठा झटका! ॲपलनंतर गूगलची रशियावर कारवाई

Cyber Strick: रशियाला पुन्हा एकदा मोठा झटका! ॲपलनंतर गूगलची रशियावर कारवाई

Cyber Strick: रशियाला पुन्हा एकदा मोठा झटका! ॲपलनंतर गूगलची रशियावर कारवाई

रशिया (Russia) युद्धाच्या सातव्या दिवशी युक्रेनवर (Ukraine) जोरदार हल्ला करत आहे. अशातच युक्रेनच्या विनंतीनंतर लोकप्रिय टेक कंपनी ॲपलने (apple) रशियावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपलने रशियातील आपल्या उत्पादनांची विक्री थांबवल्याच्या माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यानंतर गूगलने (Google) आता मोठा निर्णय घेतला आहे. गूगलने रशियन मीडिया चॅनल्सवर बंदी घातली आहे. याबाबतची माहिती खुद गूगलनेच दिली आहे. कंपनीने गूगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) आरटी न्यूज (NT News) आणि स्पुटनिकसंबंधित (Sputnik) मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. यापूर्वी यूट्यूबने (Youtube) दोन्ही मीडिया आउटलेट्ससंबधित यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली होती.

दरम्यान बऱ्याच टेक कंपन्यांनी रशियाच्या सरकारी मीडियाला आपल्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. माहितीनुसार युक्रेनसंबंधित चुकीची माहिती पसरवत असल्यामुळे न्यूज चॅनल्सवर बंदी घातली आहे.

याबाबत आरटी न्यूजच्या डेप्युटी एडिटर-इन-चीफ Anna Belkina म्हणाले की, टेक कंपन्यांनी त्याच्या मीडिया आऊटलेटवर विनाकारण बंदी घातली आहे. याबाबत स्पुटनिकने अद्याप काहीही वक्तव्य केलेले नाही. दरम्यान गूगलने युरोपमध्ये या दोन्ही न्यूज साईट्सच्या ॲप्सला प्ले स्टोअरवर बंदी घातली आहे.

यूट्यूबने रशियाच्या सरकारी मीडियावर बंदी घालण्यापूर्वी जाहिरातीच्या माध्यमातून होणारी कमाईवर रोख लावली होती. त्यानंतर फेसबूकची कंपनी मेटाने पाऊल उचलले. मेटाच्या माहितीनुसार, युरोपीय देशांच्या मागणीनंतर त्यांनी आपल्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर रशियन मीडियावर युरोपमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय गूगलने गूगल मॅप्सच्या लाईव्ह ट्रॅफिक फिचर युक्रेनमध्ये बंद केले आहे. तसेच ॲपलने ॲपल मॅप्सच्या ट्रॅफिक आणि लाईव्ह इन्सीडेंट फिचर डिसेबल केले आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War: अमेरिकेने रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे भारतीय एअरफोर्सवर होणार परिणाम?


 

First Published on: March 2, 2022 3:23 PM
Exit mobile version