Google-Airtel Partnership: गूगल आणि भारतीय एयरटेलमध्ये १ अरब डॉलर्सचा करार, स्वस्त स्मार्टफोन अन् 5G तंत्रज्ञान विकसित करणार

Google-Airtel Partnership: गूगल आणि भारतीय एयरटेलमध्ये १ अरब डॉलर्सचा करार, स्वस्त स्मार्टफोन अन् 5G तंत्रज्ञान विकसित करणार

Google-Airtel Partnership: गूगल आणि भारतीय एयरटेलमध्ये १ अरब डॉलर्सचा करार, स्वस्त स्मार्टफोन अन् 5G तंत्रज्ञान विकसित करणार

हल्ली सर्वांचीच मूलभुत गरज असलेली दिग्गद टेक कंपनी गुगल आणि भारतीय टेलीकॉम ऑपरेटर भारती एअरटेल या दोन कंपन्या पार्टनरशिप करणार आहेत. गुगलने नुकतीच एक घोषणा केली आहे की, भारती एअरटेलमध्ये १ अरब डॉलर म्हणजेच जवळपास ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गुगल आणि भारती टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांना नेहमीच उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातच दोन्ही कंपन्यांनी एकमेकांसोबत करार करुन भारतातील डिजिटल इकोसिस्टम अधिक जलद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांमध्ये करार केला आहे.

या करारानुसार, गुगल कंपनी एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या गुंतवणूकीचा फायदा आता भारतीयांना होणार आहे. या दोन कंपन्यांच्या करारामुळे एअरटेल ही कंपनी भारतात स्वस्त दरातील स्मार्टफोन आणि अन्य डिजिटल डिव्हाइसची निर्मिती करणार आहे. याशिवाय हे डिव्हाइस आता सर्वसामान्यांना परवडणारे असणार आहेत.

 

ही दोन कंपन्यांमधील गुंतवणूक पुढील पाच वर्षात होणार आहे. भारतीयांसाठी स्वस्त दरातील स्मार्टफोन आणि बाकी अन्य डिव्हाइस उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय 5G आणि इतर डि़जिटल सोयी सुविधांसाठी भारतात विशेष नेटवर्क डोमेन तयार करण्यासाठी या गुंतवणूकीचा फायदा होणार आहे. गुगल कंपनी ही ७०० दशलक्ष डॉलर हे भारतातील एअरटेलमध्ये आपल्या India Digitization Fund च्या माध्यमातून ही मोठी गुंतवणूक करणार आहे. भारती एअरटेलचे शेअर ७३४ रुपये प्रती शेअर या दराने गुंतवण्यात येणार आहे. यामुळे एअरटेल आपली सेवा अधिक उत्तमरित्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. याबाबत शुक्रवारी दोन्ही कंपन्यानी माहिती दिली आहे.

भारतातील तंत्रज्ञानाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले आहे. याशिवाय भारताचे उत्तमरित्या डिजीटल भविष्य घडवण्यात एअरटेल ही प्रमुख कंपनी असल्याचे गुगल सीईओ सुंदर पिच्चई यांनी सांगतले आहे.


हे ही वाचा – चित्रपट निर्माता सुनील दर्शनने Google CEO सुंदर पिचाईंविरोधात केला गुन्हा दाखल ; काय आहे कारण?


 

First Published on: January 28, 2022 2:19 PM
Exit mobile version