अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य पिचाई, नादेलासह ६ भारतीयांच्या हातात

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य पिचाई, नादेलासह ६ भारतीयांच्या हातात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या साथीमुळे खराब झालेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ग्रेट अमेरिकन इकॉनॉमिक रीव्हाइवल उद्योग (Great American Economic Revival Industry) समूह तयार केले आहेत. यात ट्रम्प यांनी गुगलच्या सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टच्या सत्या नादेला यांच्यासह सहा भारतीयांचा समावेश केला आहे. हे आर्थिक पुनरुज्जीवन उद्योग गट ट्रम्प यांना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयी मार्गदर्शन करतील. ट्रम्प यांनी अमेरिकेची आर्थिक परिस्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी विविध उद्योग आणि वर्गांतील २०० पेक्षा जास्त अमेरिकन दिग्गजांचे अठरा गट तयार केले आहेत. तांत्रिक गटामध्ये सुंदर पिचाई आणि सत्या नादेला यांच्या व्यतिरिक्त आयबीएमचे अरविंद कृष्णा आणि मायक्रॉनचे संजय मेहरोत्रा​​ यांचा समावेश आहे.

तसेच पेर्नोड रिकॉर्डचे भारतीय-अमेरिकन एन. मुखर्जी यांचे उत्पादन गटात समावेश करण्यात आला आहे. वित्तीय सेवा गटात मास्टरकार्डच्या अजय बांगा यांना स्थान देण्यात आलं आहे. ट्रम्प म्हणाले, “ही नावे मला सर्वात चांगली आणि सर्वात हुशार वाटतात. आणि ते आम्हाला काही कल्पना देणार आहेत.”

इतर गटात टीम कूक, मार्क झुकरबर्ग

दुसर्‍या गटामध्ये अॅपल कंपनीचे कार्यकारी अधिकारी टीम कुक, ओरॅकलचे लॅरी एलिसन आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. मॅन्युफॅक्चरिंग ग्रुपमध्ये कॅटरपिलरचे जिम उम्प्लेबी, टेस्लाचे इलॉलोन मस्क, फियाट क्रिसलरचे माईक मॅन्ली, फोर्डचे बिल फोर्ड आणि जनरलचे मेरी बारा यांचा समावेश आहे. व्हिजा प्रकरणांमध्ये अल केली, ब्लॅकस्टोनचे स्टीफन श्वार्झमन, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटच्या अॅबीगेल जॉन्सन आणि इंटूइटचे सासन गुदाराजी यांचा समावेश आहे.

द्विपक्षीय गट व्हाईट हाऊस बरोबर एकत्र काम करणार

अमेरिकेच्या अध्यक्षांनी ज्या गटांची स्थापना केली त्यात शेती, बँकिंग, बांधकाम-कामगार, संरक्षण, ऊर्जा, आर्थिक सेवा, अन्न व पेये, आरोग्य, आतिथ्य, उत्पादन, रिअल इस्टेट, किरकोळ, तंत्रज्ञान, दूरसंचार, वाहतूक, खेळ आणि विचारशील नेत्यांचा समावेश आहे. अमेरिकन नेत्यांचे हे द्विपक्षीय गट व्हाइट हाऊसबरोबर काम करतील जेणेकरून अमेरिकेची आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसेल.

 

First Published on: April 16, 2020 8:19 AM
Exit mobile version