Corona लसीकरणासाठी मिळणार सुट्टी

Corona लसीकरणासाठी मिळणार सुट्टी

लसीकरण

देशात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने लसीकरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत सहभाग घेत लस टोचून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही सुट्टीची तरतुद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढत असल्याने ८ वीपर्यंतच्या शाळाही ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरु ठेवल्या आहेत. परंतु या संस्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

उत्तरुप्रदेशमध्ये ६ लाखाहून अधिक रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत. तर सध्या ९१९५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत ५ लाख ९८ हजार ००१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा- Maharashtra Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; मृतांची संख्या मात्र वाढली

 

First Published on: March 31, 2021 3:21 PM
Exit mobile version