Indian Variant हा शब्द वापरलेला सर्व कंटेन्ट सोशल मीडियावरुन काढून टाका, सरकारचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

Indian Variant  हा शब्द वापरलेला सर्व कंटेन्ट सोशल मीडियावरुन काढून टाका, सरकारचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषयीची संपूर्ण माहिती मिळत आहे. मात्र यातही अनेकदा खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरील कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याचे आदेश या आधीही सरकारने सोशल मीडिया कंपन्याना दिले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा ‘इंडियन व्हेरियंट’ (Indian Veriant) हा चुकीचा शब्द वापरुन खोटी माहिती पसरवणाऱ्या सर्व सोशल मीडियावरील कंटेन्ट ताबतोब काढून टाकण्याचे आदेश सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना दिले आहे. (government ordered social media companies to remove all content using term Indian Variant from social media)

आयटी मंत्रालयाने यासंदर्भात बजावलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचे भारतीय रुप ( Indian Variant) हा शब्द संपूर्ण देशात पसरत आहे. हा शब्द चुकीचा आहे. कोरोनाचे भारतीय रुप अस्तित्वात नाही. जागतिक आरोग्य संघटनेने देखिल आपल्या अहवालात Indian Variant हा शब्द कोरोना व्हायरसशी जोडलेला नाही. त्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलयाने १२ मे रोजी भारतातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कोरोना विषाणूशी निगडीत Indian Veriant हा चुकीची माहिती देणारा शब्द,त्याचा संदर्भ, त्यासंदर्भातील कोणताही कंटेन्ट आढळल्यास तो तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरससंबंधी खोटी आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी आधीही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वेही सांगितली होती. भारतात गूगल, फेसबुक आणि ट्विटरद्वारे मोठ्या संख्येने लोक सोशल मीडियाचा वापर करतात. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात ५३ कोटी व्हॉट्स अँप युझर्स आहेत. तर ४४.८ करोड यू ट्यूब युझर्स, ४१ कोटी फेसबुक आणि २१ कोटी ट्विटर युझर्स आहेत.


हेही वाचा – कोरोना काळात केंद्र सरकारकडून दीड कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढ करण्याच निर्णय

 

 

First Published on: May 22, 2021 4:15 PM
Exit mobile version