घरताज्या घडामोडीकोरोना काळात केंद्र सरकारकडून दीड कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढ करण्याच निर्णय

कोरोना काळात केंद्र सरकारकडून दीड कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढ करण्याच निर्णय

Subscribe

महागाई भत्ता दरमहिना १०५ रुपयांवरुन २१०रुपये करण्यात आला

कोरोना काळात केंद्र सरकारने आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलादायक भेट दिली आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून दीड कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोनाकाळात कामगार आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ एप्रिल २०२१ पासून याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरुन कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातही वाढ होईल. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दरमहिना १०५ रुपयांवरुन २१०रुपये करण्यात आल्याचे मुख्य कामगार आयुक्त सेंटरच्या डीपीएसने सांगितले आहे. (central government increase dearness allowance of more than one and a half crore employees during the Corona period)

केंद्रीय क्षेत्रातील विविध नियोजित रोजगारात गुंतलेल्या सुमारे दीढ लाख कर्मचारी आणि कामगारांना या भत्ता वाढीचा फायदा होणार आहे. VDAमधील वाढीमुळे आपत्ती काळात दिलासा मिळेल,असे कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोना महामारिच्या दुसऱ्या लाटेत देश अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. या काळात मध्यवर्ती भागात विविध अनुसूचित नोकरीमध्ये गुंतलेल्या विविध श्रेणीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे,असे मंत्रालयाने म्हटले आहे. हा निर्णय रेल्वे प्रशासन,खाणी,तेलक्षेत्र,प्रमुख बंदरे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या इतर आस्थापनांना लागू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे देखिल मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कॉन्ट्राक्ट आणि कॅज्युअल अशा दोन्ही कर्मचाऱ्यांना समान प्रमाणात लागू होईल,असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

महागाई भत्त्याचे दोन प्रकार आहेत. डियरनेस अलाउन्स ज्याला आपण महागाई भत्ता असे म्हणतो. औद्योगिक महागाई भत्ता आणि व्हेरिएबल महागाई भत्ता. व्हेरिएबल महागाई भत्त्यामध्ये दर महिन्याला पुनरावलोकन करुन दर सहा महिन्यांनी त्यात सुधारणा केली जाते. किरकोळ महागाईच्या आधारे केंद्र सरकार कर्मचारी आणि कामगारांच्या भत्त्यात सुधारणा करते.

- Advertisement -

हेही वाचा – आंध्र प्रदेशमध्ये कोरोना झटपट बरा करणार्‍या औषधासाठी लोकांची उडाली झुंबड!

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -