‘या’ कारणांमुळे २० रुपयांचे नाणे ठरणार सर्वात वेगळे

‘या’ कारणांमुळे २० रुपयांचे नाणे ठरणार सर्वात वेगळे

पंप्रधान नरेंद्र मोदी चलन जारी करताना

सरकार ने बुधवारी २० रुपयांची नवीन नाणी जारी करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्रालयाने या संबधीत एक अधिसुचना जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोट बंदी केल्यानंतर देशात नवीन नोटा आणि नाणी चलनात आली. दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. या नवीन नोटांबद्दल लोकांनी उत्साह दाखवला होता. या चलनामध्ये आता २० रुपयांचे नाणे येणार आहे. ही नाणी २७ MM च्या आकाराची असणार आहेत. वीस रुपयांच्या नाण्यांवच्या किनाऱ्यावर कोणतेही निशान नसणार आहेत. नाण्याच्या बाहेरील बाजूला ६५ टक्के तांबे, १५ टक्के जिंक आणि २० टक्के निकल असणार आहे. नाण्याच्या आतील बाजूला ७५ टक्के तांबे, २० टक्के जिंक आणि ५ टक्के निकलचा वापर करण्यात आला आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

नाण्याच्या समोरील भागात अशोक स्तंभाचे निशान असणार आहे. त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिले असणार आहे. डाव्या बाजूला ‘भारत’ आणि ‘India’ छापलेले असणार आहे. मागील भागावर २० अंकात आणि अक्षरात लिहिले असणार आहे. यावर रुपयाचे चिन्ह असणार आहे. दहा वर्षापूर्वी २००९ मध्ये आरबीआयने दहा रुपयांची नवीन नाणी जारी केली होती. तेव्हा पासून आतापर्यंत १३ वेळा नाण्यांची डिझाईन बदलण्यात आली.

First Published on: March 7, 2019 2:10 PM
Exit mobile version