घरमुंबईचलनातून बाद झालेल्या 26 लाख किंमतीच्या नोटा जप्त

चलनातून बाद झालेल्या 26 लाख किंमतीच्या नोटा जप्त

Subscribe

आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

भारतीय चलनातून बाद झालेल्या 26 लाख रुपये किंमतीच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या नोटा बाळगणार्‍या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये 1 हजार आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटांचा समावेश आहे.

उल्हासनगर – 4 येथील श्रीराम चौकाजवळ असलेल्या सूर्या लॉज जवळ एक व्यक्ती मोटारगाडीतून जुन्या नोटा घेऊन येत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस नाईक के. आय. सूर्यवंशी, दिनेश पाटील, मोरे, एस. एस. गायकवाड यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता सापळा रचला. काही वेळात या ठिकाणी एम एच 05 डी एच 1179 या स्विफ्ट कार मधून एक इसम लाल रंगाची पिशवी हातात घेऊन उतरला. पोलिसांना बघून तो पळू लागला मात्र पोलीस पथकाने त्याला पळण्यापूर्वीच पकडले.

- Advertisement -

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याचे नाव लक्ष्मण सुरेश मनुजा ( 30 ) असल्याचे समजले. तो उल्हासनगर – 3 येथील सी ब्लॉक परिसरात राहतो . आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केलेली आहे . त्याच्याकडून 26 लाख रुपये किंमतीच्या जुन्या चलनी नोटा , सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या नोटा आरोपी कोणाला देण्यासाठी आला होता, आणि कोणत्या उद्देशाने आणल्या होत्या याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -