पाकिस्तानचं वराती मागून घोडं! जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर केला कब्जा

पाकिस्तानचं वराती मागून घोडं! जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर केला कब्जा

मसूद अजहर

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा पर्दाफाश झाल्यानंतरही या संघटनेशी कोणताही संबंध नसल्याची ओरड करणाऱ्या पाकिस्तानला अखेर उशीराने का होईना शहाणपण सुचले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून भारताच्या आक्रमक पवित्र्याला घाबरून अखेर पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद संघटनेचे प्रमुख मसूद अजहरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर पंजाब सरकारने कब्जा केला आहे.

पाकिस्तानच्या ट्विटरवरून माहिती 

मिळालेल्या माहितीनुसार, या संघटनेचा म्होरक्या सरगना मसूद अजहदेखील याच मुख्यालयात भारताच्या कारवाईला घाबरून लपून बसला असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गव्हर्मेंट ऑफ पाकिस्तान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहितील दिली असून त्या संघटनेच्या मुख्यालयावर नियंत्रण आणण्यात आल्याने त्यातील दोन प्रमुख सदस्य मदरसतुल शबीर आणि जामा-ए-मस्जिद सुभानअल्ला यांच्यावरही नियंत्रण आणण्यात आल्याचे समजते. पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या मुख्यालयाशी संबंधीत सर्व गोष्टीं हाताळण्यासठी एक प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यालयावर नियंत्रण आणण्याची कारवाई पाकचे पंतप्रधान इम्रान खानच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे. जैशच्या बहावलपूर येथील कॅम्पसमध्ये ७० शिक्षक आणि ६०० विद्यार्थी उपस्थित होते. सध्या पाक पंजाब पोलीस ही संघटनेच्या मुख्यालयाच्या सुरक्षेचे काम करत आहे.

First Published on: February 22, 2019 9:21 PM
Exit mobile version