‘तुमची हिंमत कशी होते?’ १६ वर्षांच्या ग्रेटाने जागतिक नेत्यांना केला सवाल

‘तुमची हिंमत कशी होते?’ १६ वर्षांच्या ग्रेटाने जागतिक नेत्यांना केला सवाल

'तुमची हिंमत कशी होते?' १६ वर्षांच्या ग्रेटाने जागतिक नेत्यांना केला सवाल

सध्या जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होतं आहे. यावर मात करण्यासाठी आणि उपाय योजना करण्यासाठी न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघाची ‘युएन हवामान कृती परिषद’ आयोजित करण्यात आली होती. २१ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर पर्यंत या परिषदेचा कालावधी होता. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या परिषदेत उपस्थित असलेल्या १६ वर्षीय मुलीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रेटा थनबर्ग असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी स्विडिश पर्यावरण कार्यकर्ती असून ती पर्यावरण संवर्धनासाठी योगदान करते. या तरुणीने या परिषदेत थेट जागतिक नेत्यांवर आरोप केला आहे. ग्रेटा अशी म्हणाली की, ‘तुम्ही दिलेल्या प्रत्येक खोट्या आश्वासनामुळे माझे स्वप्न आणि बालपण हिरावून घेतलं आहे.’

पर्यावरणाकडे सध्या दुर्लक्ष केलं जातं असून हे सर्व खूप चुकीच आहे

तसंच ग्रेटा परिषदेत पुढे असं देखील म्हणाली की, ‘पर्यावरणाकडे सध्या दुर्लक्ष केलं जातं असून हे सर्व खूप चुकीच होत आहे. मी इथे थांबायला नाही पाहिजे. समुद्रापलीकडे असलेल्या शाळेत मी निघून जायला हवं. तुम्ही दिलेल्या खोट्या आश्वासनामुळे तुम्ही माझी स्वप्न आणि बालपण हिरावून घेतलं आहे. तरी तुम्ही आम्हा सारख्या तरुणांकडे आशेच्या दृष्टीने कसं येता? गेले २० वर्ष तुम्हाला तज्ज्ञांकडून जैवसंस्था नष्ट होतं आहे, लोकांचा मृत्यू होतं आहे, तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. तुमची हिंमत कशी होते?’, असा थेट प्रश्न तिने जगभरातील नेत्यांना युनोच्या व्यासपिठावरून विचारला आहे.

आता चर्चा करण्याचे दिवस संपले असून कृती करण्याची गरज

दरम्यान या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपली भूमिका मांडली आहे. ‘जागतिक हवामान बदल्याच्या संकटावर जर मात करायची असेल तर आता यावर सुरू असलेले प्रयत्न हे मर्यादित आहेत. ते आपल्याला स्वीकारावे लागेल. आता चर्चा करण्याचे दिवस संपले असून कृती करण्याची गरज आहे’, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

First Published on: September 24, 2019 1:41 PM
Exit mobile version