Corona वर मात केल्यानंतर व्यावसायिकाने ऑफिसला बनवले COVID हॉस्पिटल!

Corona वर मात केल्यानंतर व्यावसायिकाने ऑफिसला बनवले COVID हॉस्पिटल!

प्रातिनिधीक फोटो

गुजरातमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना चांगले उपचार देणे हे प्रशासनासाठी एक आव्हान बनले आहे. गुजरातमधील सूरत येथील एका व्यावसायिकाने कोरोना रुग्णांसाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. सुरतच्या ६३ वर्षीय रिअल इस्टेट उद्योगपती कादर शेख यांनी कोरोना रूग्णांसाठी विनामूल्य हॉस्पिटल सुरू केले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कादर शेख हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. कादर यांच्या उपचारासाठी बराच पैसा खर्च झाला. यानंतर त्यांच्या मनात असा विचार आला की, ज्यांच्याकडे पैसा नाही असे लोकं आपले उपचार करू शकत नाहीत. शेख यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या श्रेयम कॉम्प्लेक्समधील ३० हजार चौरस फूट कार्यालयाला कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यास सुरूवात केली.

कादर शेख यांनी आपल्या ऑफिचे रूपांतर ८५ बेडचे कोविड हॉस्पिटलमध्ये केले असून यामध्ये ऑक्सिजनची सुविधा देखील आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

वैद्यकीय कर्मचारी, आयसीयू व इतर सुविधा पुरवण्यासाठी कादर यांनी सुरत महानगरपालिकेशी करार केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, सूरत महानगरपालिकेचे आयुक्त बी.एन.पानी आणि उप आरोग्य आयुक्त डॉ.आशिष नाईक यांनी या हॉस्पिटलला भेट दिली आणि त्यास ग्रीन सिग्नल देखील दिला आहे.

मंगळवारी रुग्णालय तयार झाले असून कादर शेख यांनी आपल्या नातीच्या (हिबा) नावाने रुग्णालय सुरू केले आहे. डॉ. नाईक यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की,’ आम्ही संपूर्ण परिसर पाहिला असून या रुग्णांना ते योग्य वाटले. हे रुग्णालय येत्या काही दिवसांत सिव्हिल हॉस्पिटलमधून रूग्णांना रेफर केल्यानंतर हे हॉस्पिटल सुरू होईल.


वेड्या मुलाची वेडी माया, रुग्णालयाच्या खिडकीत बसून आईच दर्शन!

First Published on: July 22, 2020 4:10 PM
Exit mobile version