गुजरातमध्ये मांज्यामुळे ६ जणांचा मृत्यू; ५०० जखमी

गुजरातमध्ये मांज्यामुळे ६ जणांचा मृत्यू; ५०० जखमी

गुजरातमध्ये मांज्यामुळे ६ जणांचा मृत्यू

देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी केली जात आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. मात्र गुजरातमध्ये पतंग उडवणाऱ्यांनी मजा घेतली खरी पण यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. १४ जानेवारीला पतंगीच्या मांज्यामुळे गळा चिरुन सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर या मांज्यामुळे गुजरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये छतावरुन कोसळून १०० पेक्षा अधिक जणांचा समावेश आहे. गुजरातमध्ये १४ आणि १५ जानेवारीला पतंग उडवली जाते. आकाशामध्ये रंग-बिरंगे पतंग पहायला मिळतात. पतंग उडवताना निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

पतंग उडवताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये अनेक ठिकाणावरुन १०८ क्रमांकावर बरेच कॉल आले. पंतग उडवताना छतावरुन पडून तसंच पतंगीचा मांजा कापल्यामुळे जखमी झाल्याचे अनेकांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मेहसाणा जिल्ह्यामध्ये पतंगीच्या धारधार मांज्यामुळे गळा कापला गेला आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर आनंदमधील बदलापूर येथे एका तरुणाचा मांज्यामुळे गळा कापला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बनासकांठा जिल्ह्याच्या डीसावाडी रोडवर पतंग उडवताना छतावरुन पडूनन १० वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.

५०० पेक्षा अधिक जण जखमी

दरम्यान, अरवल्लीच्या मोडासामध्ये स्कूटरवरुन गांधीनगरला जाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा मांजामुळे गळा कापला आणि तिचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या रामपुरा गावामध्ये तरुणाचा मांज्याने गळा कापून मृत्यू झाला. अशापध्दतीने पतंगीच्या मांज्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक भागामध्ये ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये ७० जणांचा मांज्यामुळे गळा कापला, १०० लोकं छतावरुन खाली पडले. तर अनेक जण पतंगीमुळे रस्ता अपघातात होऊन जखमी झाले आहेत.

हेही वाचा – 

मकरसंक्रांत : पतंगामुळे ३०० जण जखमी

First Published on: January 15, 2019 4:38 PM
Exit mobile version