घरदेश-विदेशमकरसंक्रांत : पतंगामुळे ३०० जण जखमी

मकरसंक्रांत : पतंगामुळे ३०० जण जखमी

Subscribe

मकरसंक्रांतीनिमित्त उडविण्यात येणाऱ्या पतंगामुळे जयपूर शहरातील ३०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात मसंक्रांतीचा सण हा विविध पद्धतीने साजरा केला जात असला तरी देखील सर्व ठिकाणी मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवीणे ही प्रथा आहे. मात्र मकरसंक्रातीला पतंगामुळे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मकरसंक्रातीच्या निमित्त जयपूर शहर रंगीबिरंगी पतांगांनी भरुन गेले होते. परंतु याच पतंगामुळे जयपूर शहरातमध्ये २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

मकरसंक्रांती दरम्यान, पतंगामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी जखमींचे प्रमाण लक्षणीय आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात आतापर्यंत २२७ रुग्णांवर सोमवारपासून उपचार करण्यात आले आहे. आता पर्यंत या शहरातील ४५ रुग्ण पतंगांमुळे गंभीर जखमी झाले आहेत तर, ४१ रुग्ण मांजामुळे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

असे घडले अपघात

अनेकदा कटलेली पतंग पकडण्याच्या नादात आपण कुठे आहोत याचे भान देखील बऱ्याचजणांना नसतो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना जयपूर शहरातमध्ये घडली आहे. कटलेली पतंग पकडण्याच्या नादात एक चार वर्षाचा मुलगा गच्चीवरुन खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या चिमुरड्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. तर पतंग पकडण्याच्या नादात मासूम आलम नावाचा एक तरुण दुचाकीखाली आल्यानं त्याला पाय गमवावे लागले आहेत. तर मांजा गळ्यात अडकल्याने तर पतंग चेहऱ्यासमोर आल्याने देखील मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार जखमी झाल्याची समोर आली आहे. पतंगांमुळे होणारे हे अपघात थांबवण्यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


वाचा – अक्षय कुमारची मुलीसोबत पतंगबाजी, Video व्हायरल

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -