मंदिरात मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर आरती लावल्याने तरुणाला मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू

मंदिरात मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर आरती लावल्याने तरुणाला मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू

गुजरातमधील मेहसाण जिल्ह्यातील एका परिसरात लाऊड स्पीकरवरून झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मंदिरात मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर आरती लावल्यानं हा प्रकार घडल्याचे समजतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांवरील वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी हे वक्तव्य महाराष्ट्रात केलं असलं तरी, त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत.

जसवंतजी ठाकोर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास हा प्रकार घडला. मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाजमध्ये त्याची हत्या झाली. बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जसवंतचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघे घराशेजारीच असलेल्या मेल्डी माता मंदिरात आरती करत होते. लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात आरती सुरू असताना सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंती ठाकोर, जावन ठाकोर आणि विनुजी ठाकोर तिथे पोहोचले. त्यावेळी ‘इतक्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर आरती का लावली आहे’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर ‘आम्ही आरती करत आहोत’, असं उत्तर अजित ठाकोर यांनी दिलं. त्यानंतर सदाजी ठाकोर यांनी शिवीगाळ सुरू केली. अजित ठाकोर यांनी विरोध करताच सदाजी यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना बोलावलं. त्या सगळ्यांनी जसवंत आणि अजित यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी झाले. त्यांना गंभीर अवस्थेत मेहसाणातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे जसवंतनं अखेरचा श्वास घेतला. अजित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


हेही वाचा – नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीत भीषण आग

First Published on: May 6, 2022 5:16 PM
Exit mobile version