गुजरातमध्ये नो रिपीट फॉर्म्युला, २४ नव्या मंत्र्याचा शपथविधी

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर आज २४ मंत्र्याचा शपथविधी पार पडला . मात्र यावेळी भाजपने नो रिपीट फॉर्म्युला वापरत मंत्रिमंडळात २४ नवीन चेहऱ्यांना संधी देत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्र्याना डच्चू दिला आहे. यामुळे राजकीय वर्तृळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पटेल यांच्या मंत्रिमंडळात २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. भाजपाने गुजरातमध्ये नो रिपीट फॉर्म्युला वापरत जुन्या मंत्र्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना स्थान दिले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षही बदलण्यात आले आहे. भारताच्या राजकारणात पहील्यांदाच भाजपने हा प्रयोग गुजरातमध्ये केला आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच भाजपने हा निर्णय घेतला आहे. त्याला कितपत यश मिळेल हे तेव्हाच कळणार असल्याने सध्या डच्चू मिळालेल्या मंत्र्यानी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. भूपेंद्र पटेल यांच्या या नवीन मंत्रिमंडळात २४ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

केंद्रीय मंत्रीपदाची शपथ राजेंद्र त्रिवेदी, जीतू वाघानी,अर्जुन सिंह चव्हाण. राघव पटेल, पूर्णेश मोदी, प्रदीप सिंह परमार, ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई आणि किरीट सिंह,नरेश भाई पटेल यांनी घेतली.

तर राज्य मंत्री म्हणून हर्ष संघवी, बृजेश मेरजा, मनिषा वकील, जगदीश भाई पांचाल, जीतू भाई चौधरी, निमिषा सुतार, मुकेश पटेल, अरविंद रैयाणी, कुबेर डिंडोर यांनी शपथ घेतली आहे.

तर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी राजीनामा दिला असून त्यांच्याजागी निमा आचार्य यांना भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आले आहे. आचार्य यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.

First Published on: September 16, 2021 4:06 PM
Exit mobile version