Niger Terror Attack: नायजर देशात पडला मृत्यांचा सडा, तीन तासांत १३८ जणांची हत्या

Niger Terror Attack: नायजर देशात पडला मृत्यांचा सडा, तीन तासांत १३८ जणांची हत्या

Niger Terror Attack: नायजरमध्ये पडला मृत्यांचा सडा, तीन तासांत १३८ जणांची हत्या

आफ्रिक खंडातील नायजर देशामध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे शहरात मृत्यांचा सडा पडला आहे. दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत अवघ्या तीन तासांत १३७ निष्पापांचा बळी घेतला आहे. यादरम्यान दहशतवाद्यांनी शहरातील अनेक घरे देखील पेटवून दिली.नायजर देशाच्या पश्चिम भागातील टाहौआतील इंटाजेने, बॅकोरेट आणि अन्य काही गावात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत तब्बल १३८ जणांची हत्या केली.

दहशवाद्यांनी केली १३८ निष्पापांची हत्या

यामुळे येथील अनेक शहरांमध्ये अक्षरश: रक्ताचे पाट वाहत होते. माली देशाच्या सीमेलगत ही शहरे आहेत. या दहशतवादी हल्ल्याची अद्यात कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारली नाही. सरकारी प्रवक्ते अब्दुलरहमान झकारिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. येथील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जवळपास १३७ जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

काही आठवड्यांपूर्वी नायजर देशामध्ये मोहम्मद बाझूम यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या निवडीनंतर नायजरमधील अनेक गावांमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्या. मागील दिवसांपूर्वी ६६ जणांची हत्या करण्यात आली होती. तसेच सुरक्षा दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात येत आहेत.


 

First Published on: March 23, 2021 12:49 PM
Exit mobile version