पगार मिळाला नाही म्हणून त्यानं खाल्लं गवत आणि चारा!

पगार मिळाला नाही म्हणून त्यानं खाल्लं गवत आणि चारा!

प्रातिनिधीक फोटो

लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ साधारण ५ मिनिटांचा आहे. यामध्ये एक व्यक्ती गवत खाऊन त्यानंतर रवंथ करतानाही दिसतोय. आजतक या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रृपवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील गवत खाताना दिसणारा व्यक्ती गुरूग्रामच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा पगार न झाल्याने त्याने गवत खाऊन दिवस काढण्याचा निर्णय घेतला.

या घडलेल्या प्रकारानंतर बीएसएनएल कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्याचे नाव संजीव असून तो पंजाबचा असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले. हा व्यक्ती आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी पंजाब ते गुरुग्रामपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास करत काम करत होता.

पगार न मिळाल्याने झाला हैराण

बीएसएनएल कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करायचा, परंतु तेथून नोकरी सोडल्यानंतर त्याने बीएसएनएल कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, असे सुरक्षा रक्षक संजीव यांनी सांगितले. परंतु सिक्युरिटी कंपनीने दोन महिन्यांपासून एक रुपया देखील दिला नाही, त्यामुळे पगार न मिळाल्याने हैराण झाल्यानंतर त्यांनी मी हे पाऊल उचलले. बीएसएनएलमध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचारी संजीवसह देसराज, परवीन आणि राम सिंग यांनी असे सांगितले की, जेव्हा पगाराविषयी आमच्या सुरक्षा प्रभाराशी बोलणे व्हायचे तेव्हा पगार मिळेल, असे सांगून ते हा विषय दुर्लक्ष करायचे.

कोरोनाने नाही तर उपासमारीने जीव जाईल

दरम्यान, त्या सुरक्षा एजन्सीशी करार संपल्यानंतर दुसरे सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांची भरती होते. परंतु जुन्या कर्मचाऱ्यांचे पगार कंपनी देण्यास टाळाटाळ करताना दिसतेय. एकीकडे देश कोरोनाशी लढा देत आहे, तर दुसरीकडे असे लोक आहेत जे गरिबांच्या कष्टांचे, हक्काचे पैसे त्यांना देण्यास अडून राहत आहे. यावेळी गरिब परिस्थिती असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, कोरोना सारख्या गंभीर परिस्थीती देशावर ओढावली असताना माणसं कोरोनाने नाही तर उपासमार, रोजगार नसल्याने आपला जीव गमावतील.


Tiktok- लॉकडाऊनमधला नवा ट्रेंड; तुम्ही स्वीकारणार का हे #Flexible Challenge
First Published on: April 23, 2020 12:11 PM
Exit mobile version