West Bengal Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रुळावरून घसरली; ३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

West Bengal Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रुळावरून घसरली; ३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

West Bengal Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रुळावरून घसरली; ३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी भागातील मॅनागुडीमध्ये बिकानेर एक्स्प्रेस (१५६३३) रुळावरून घसल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार गाडीचे १२ डब्बे रुळावरून घसरले. ही एक्स्प्रेस बिहारच्या पटनाहून आसाममधील गुवाहाटीला जात होती. यादरम्यान मॅनागुडी पार करताना ही दुर्घटना झाली. रेल्वेसह प्रशासनाचे अधिकारी दुर्घटना स्थळी पोहोचले आहेत. सध्या बचाव कार्य सुरू असून काहींना दुर्घटनाग्रस्त डब्ब्यातून बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Guwahati-Bikaner Express derails in Domohani, West Bengal)

बिकानेर एक्स्प्रेसची दुर्घटना आज संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी घडली. गाडीचे १२ डब्बे रुळावरून घसरले आणि प्रवाशांनी भरलेले ४ डब्बे पूर्णपणे पलटी झाले. यामधील एक डब्बा पाण्यात गेला, ज्यामध्ये बरेच प्रवासी अडकले आहेत. जवळपासच्या कोणत्याही स्थानकावर एक्स्प्रेसचा थांबा नव्हता आणि एक्स्प्रेस त्या भागातून जात होती. सध्या एनडीआरएफसह स्थानिक बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनास्थळी जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी ३० ते ४० रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच सिलीगुडीवरून रिलीफ ट्रेन पाठवली आहे. उत्तर बंगालचे मेडिकल कॉलेज अलर्ट झाले आहे. सर्व डॉक्टरांना आणि मेडिकल स्टाफना लवकरात लवकर रिपोर्ट करण्यासाठी सांगितले आहे. तसेच हेल्पलाईन नंबर ०३६१२७३१६२२, ०३६१२७३१६२३ जारी करण्यात आला आहे.

दरम्यान या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बातचित केली. तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – Drug Case: १६ कोटींच्या मेथॅक्युलॉन ड्रग्जसह तिघांना अटक


 

First Published on: January 13, 2022 6:15 PM
Exit mobile version