अर्थसंकल्पाआधी हलवा समारंभ का केला जातो? वाचा

अर्थसंकल्पाआधी हलवा समारंभ का केला जातो? वाचा

नवी दिल्लीः अर्थसंकल्प सादर होण्याआधी गेल्या गुरुवारी पारंपारिक हलवा समारंभ पार पडला. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी ट्विट करुन या समारंभाची माहिती दिली. हलवा समारंभ हा अर्थसंकल्प सादर करण्याचा अंतिम टप्पा आहे. या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हलवा समारंभ झाला. या वर्षीही डिजिटल अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

हलवा समारंभाने अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम सुरू होते. कोरोनामुळे डिजिटल अर्थसंकल्प सादर होऊ लागला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डिजिटल अर्थसंकल्प सादर झाला. त्यामुळे अर्थसंकल्पाची छपाईच झाली नाही. उद्या, १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन ह्या २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री सितारमन यांचे संसदेतील भाषण संपल्यानंतर युनियन बजेट मोबाईल app वर संपूर्ण अर्थसंकल्प उपलब्ध होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्याआधी झालेल्या हलवा समारंभात राज्य अर्थमंत्री, सचिव व अधिकारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पाच्या छपाई आधी हलवा समारंभ आयोजित केला जातो. या समारंभात अर्थमंत्री सितारमन यांनी स्वतः सर्वांना हलवा दिला. अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खास हलवा समारंभाचे आयोजन केले जाते. या समारंभात अर्थमंत्री स्वतः सर्वांना हलवा देतात, अशी पारंपारिक पद्धत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे हलवा समारंभ झाला नाही. त्यावेळी मिठाई देण्यात आली. मात्र या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे फोटो अर्थमंत्री सितारमन यांना सोशल मिडियावर प्रसिद्ध केले. या फोटोत राज्य अर्थमंत्री व अन्य अधिकारी-कर्मचारी दिसत आहेत.

मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आर्थिक वर्ष 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरही चर्चा होणार आहे

First Published on: January 31, 2023 11:09 PM
Exit mobile version