लज्जास्पद! अल्पवयीन मुलाचा दुकानदाराकडून छळ, काही पैशांसाठी हिरावलं स्वातंत्र्य

लज्जास्पद! अल्पवयीन मुलाचा दुकानदाराकडून छळ, काही पैशांसाठी हिरावलं स्वातंत्र्य

माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना पाटणामध्ये घडली आहे. राजधानीच्या परसा बाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात एका अल्पवयीन मुलावर दुकानदाराकडून क्रूरपणे छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. साईंचक नावाच्या एका मिठाईवाल्या दुकानदारानं १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला साखळीनं बांधून ठेवलं आणि त्याला काम करण्यास भाग पाडत होता. हा प्रकार काही लोकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केला.

मिठाईच्या दुकानावर छापा

‘बचपन बचाओ’च्या टीमने या साईंचक मिठाईच्या दुकानावर छापा टाकून निष्पाप मुलाची सुटका केली. तसेच त्या दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या दुकानदाराला अटक केली आहे.

पोलीस ठाण्याचे अध्यक्ष संजीव मउआर यांनी सांगितलं की, ‘बचपन बचाओ’च्या टीमचे देव वल्लभ मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईंचक या मिठाईच्या दुकानदाराकडून एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने मजुरी करण्यास भाग पाडण्यात आलं. या प्रकाराचा व्हिडीओ देखील त्यांनी पोलीस ठाण्याच्या अध्यक्षांना दाखवला. त्यानंतर ही संपूर्ण टीम अधिकाऱ्यांना घेऊन दुकानावर पोहोचली आणि मुलाला सोडवण्यात आलं. या दुकानदाराचं नाव अखिलेश यादव असं आहे. आरोपी यादवला पोलिसांनी अटक केली आहे.

दुकानदार यादवचा मोठा खुलासा

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दुकानदार यादव म्हणाला की, मुलगा समस्तीपूरचा रहिवासी आहे. तो माझ्या दुकानात पाच हजार रुपयांच्या नोकरीवर काम करतो. परंतु त्याला धूम्रपान करण्याची वाईट सवय आहे. म्हणूनच त्याला एका दिवसासाठी साखळीने बांधून ठेवण्यात आले होते, असा खुलासा यादवने केला.

दरम्यान, ‘बचपन बचाओ’च्या अधिकाऱ्याने दुकानदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी दुकानदाराला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.


हेही वाचा : Rajiv Gandhi Assassination: टीएन शेषन यांचा ‘तो’ सल्ला राजीव गांधींनी धुडकावला अन्…, पुस्तकातून खुलासा


 

First Published on: June 9, 2023 5:19 PM
Exit mobile version