Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Rajiv Gandhi Assassination: टीएन शेषन यांचा 'तो' सल्ला राजीव गांधींनी धुडकावला अन्…,...

Rajiv Gandhi Assassination: टीएन शेषन यांचा ‘तो’ सल्ला राजीव गांधींनी धुडकावला अन्…, पुस्तकातून खुलासा

Subscribe

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसाठी काँग्रेस अनेकदा त्यांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप करत असते. १९८९ मध्ये जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार स्थापन झाले. तेव्हा त्यांनी राजीव गांधींकडून स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप (SPG) सुरक्षा काढून घेतली होती. परंतु माजी पंतप्रधानांनी टीएन शेषन यांचा एक सल्ला ऐकला असता किंवा मान्य केला असता तर ८९मध्ये त्यांची सुरक्षा हटवली नसती. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांना SPG बाबतीत त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना एक सल्ला दिला होता. परंतु त्यांचा तो सल्ला राजीव गांधी यांनी धुडकावून लावला. कारण सुरक्षा दिल्यानंतर लोक भविष्यात आपल्याकडे स्वार्थी हेतूच्या नजरेने बघतील.

‘तो’ सल्ला राजीव गांधींनी धुडकावला

टीएन शेषन यांच्या ‘थ्रू द ब्रोकन ग्लास’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्यामध्ये राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वीचा एक सल्ला शेषन यांनी गांधींना दिला होता. परंतु तो त्यांनी धुडकावून लावला. याबाबत सर्व माहिती पुस्तकातून लिहिण्यात आली असून काही खुलासे या पुस्तकातून करण्यात आले आहेत. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप कायद्याचा मसुदा तयार करण्यात अशी एक घटना घडली होती. ज्याची आजची चर्चा होत आहे.

राजीव गांधी यांनी निवडणूक हरल्यानंतरही…

- Advertisement -

राजीव गांधींनी पद सोडल्यानंतरही त्यांना संभाव्य धोक्यांबाबत इशारा देण्यात आला होता. अमेरिकेचं उदाहरण देत शेषन म्हणाले की, माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांना देखील FBIकडून सुरक्षा पुरवण्याचा कायदा आहे. त्यामुळे राजीव गांधी यांनी निवडणूक हरल्यानंतरही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला तत्काळ सुरक्षेची गरज होती. त्याबाबत मी युक्तिवादही केला होता. पण राजीव गांधींना त्यांचा युक्तिवाद पटला नाही. आपण वैयक्तिक स्वार्थासाठी हे करत आहोत, यावर लोकांचा विश्वास बसेल, असं राजीव गांधींना वाटले. त्यामुळे त्यांनी त्यांचा युक्तिवाद किंवा सल्ला धुडकावून लावला.

राजीव गांधी यांना सुरक्षा देण्याबाबत चर्चा

व्हीपी सिंह सरकारमध्ये कॅबिनेट सचिव म्हणून शेषन यांनी राजीव गांधींची सुरक्षा कायम राहावी, यासाठी युक्तिवाद केला होता. परंतु त्यांच्या विनंतीकडे सरकारने लक्ष दिले नाही. सिंह पंतप्रधान झाल्यानंतर ३ डिसेंबर १९८९ रोजी शेषन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राजीव गांधी यांना ५ सुरक्षा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. राजीव गांधी यांची सुरक्षा कायम ठेवण्यात यावी, कारण त्यांच्यावरील धोका अद्यापही कमी झालेला नाही, असं अंदाज शेषन यांच्याकडून बैठकीत वर्तवण्यात आला होता.

- Advertisement -

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, पंतप्रधानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रपतींच्या कार्यकारी आदेशानुसार १९८५ मध्ये SPG ची स्थापना करण्यात आली. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप (SPG) कायद्यालाही संसदेची योग्य मान्यता मिळाली. कायद्याचा मसुदा तयार केला जात असताना, टीएन शेषन यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी संरक्षणाच्या कक्षेत समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता. या संदर्भातील उल्लेख टीएन शेषन यांच्या आत्मचरित्रात आहे. टीएन शेषन यांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.


हेही वाचा : Wrestlers Protest : बृजभूषण सिंहविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची


 

- Advertisment -