हरयाणामध्ये डोंगर कोसळून भीषण दुर्घटना! एका व्यक्तीचा मृत्यू, तर १० वाहनं गाडली गेली

हरयाणामध्ये डोंगर कोसळून भीषण दुर्घटना! एका व्यक्तीचा मृत्यू, तर १० वाहनं गाडली गेली

हरियाणामध्ये डोंगर कोसळून भीषण दुर्घटना! १० वाहनं गाडली गेली तर एका व्यक्तीचा मृत्यू

जम्मू काश्मीरपाठोपाठ हरणायमध्येही नव वर्षाच्या सुरुवातीला एक भीषण दुर्घटना घडली आहे. हरियाणातील भिवानी जिल्ह्यात डोंगर खचल्याने तब्बल ८ ते १० वाहनं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. यात जवळपास १५ ते २० लोकं अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत तीन नागरिकांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा एक मोठा भाग खचल्याने ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थनिक पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्वरित मदतकार्याला सुरुवात केली आहे. तसेच घटनास्थळावर सामान्य नागरिकांना आणि माध्यम प्रतिनिधींना जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. हरियाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल आणि एसपी अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे.

यावर अजित सिंह शेखावत यांनी म्हटले की, या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मृतांची संख्या सांगणे शक्य नाही. डॉक्टरांची टीम घटनास्थळी पोहचली असून शक्य तितक्या नागरिकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अचानक डोंगर खचल्याने त्याखाली अनेक गाड्यांमध्ये असलेले नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. या घटनेत खाण कामासाठी वापरण्यात येणारी पोपलँड आणि अन्य काही मशीनही दबल्याचे सांगण्यात आलेय. जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Constable Recruitment 2022 : CISF मध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती; कुठे, कसा करायचा अर्ज… जाणून घ्या

First Published on: January 1, 2022 2:39 PM
Exit mobile version