हरियाणाच्या गुरुग्राममधील ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग

हरियाणाच्या गुरुग्राममधील ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग

हरियाणाच्या गुरुग्राममधील ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्तीच्या प्रयत्नांवर करत आहेत. (haryana fire breaks out in an auto parts manufacturing company in bilaspur industrial area gurugram)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या गुरुग्राममधील बिलासपूर इंडस्ट्रियल एरियामध्ये ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीत अचानक भीषण आग लागली. मात्र, अद्याप या आगीचे कारण समजलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवत असून, नेमकी आग कशाने लागली याचा तपास करत आहेत.

ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे धुराचे लोळ आसपासच्या परिसरात पसरत आहेत. तसेच, आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?; ‘सामना’तून शिंदे गटाला सवाल

First Published on: October 15, 2022 8:37 AM
Exit mobile version