हाथसर प्रकरणातील आरोपी अल्पवयीन; CBI चौकशीत माहिती उघड

हाथसर प्रकरणातील आरोपी अल्पवयीन; CBI चौकशीत माहिती उघड

युवती सेना - युवासेनेच्या वतीने शिवसेना भवना बाहेर हाथरस बलात्कार आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या अमानवी गुंडाराज प्रकरणी भाजपा सरकारचा धिक्कार करण्यात आला. (फोटो - दीपक साळवी)

हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असून त्या तपासात ही माहिती समोर आली. या माहितीला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला आहे. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी सीबीआय तपात सुरू असून काल, सोमवारी त्यांनी आरोपींची ८ तास कसून चौकशी केली. या प्रकरणातील आरोपी अलीगड जिल्ह्यातील कारागृहात कैद आहेत. येथे सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांची चौकशी केली. सकाळी ११ वाजून ५० मिनिटाला कारागृहात दाखल झालेली ही टीम सायंकाळी ७ वाजता येथून बाहेर आली. याबाबत कारागृह पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, सीबीआयच्या टीमने प्रत्येक आरोपीची वेगवेगळी चौकशी केली. तसेच चारही आरोपींच्या कुटुंबियांची यापूर्वीच त्यांनी चौकशी केली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या चारपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. टाईम्स ऑफ इंडियाने त्या आरोपीचे मार्कशीट असल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये त्याची जन्मतारीख २ डिसेंबर २००२ असल्याचे नमूद केले आहे. कुटुंबियांनी ही मार्कशीट सीबीआयला दाखली आहे.

काय आहे प्रकरण 

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले.

हेही वाचा –

नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत; नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु – चंद्रकांत पाटील

First Published on: October 20, 2020 3:21 PM
Exit mobile version